शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अंकुश आणि जनाबाई प्रथम कोळेकर महाविद्यालयाची सांघिक विजेतेपदाची हॅट्ट्रिक शिवाजी विद्यापीठअंतर्गत क्रॉसकंट्री स्पर्धा

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठस्तरीय आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत आज, गुरुवारी नेसरीच्या टी. के. कोळेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अंकुश पारखेने पुरुष गटात विजेतेपद मिळविले, तर वाईच्या किसनवीर महाविद्यालयाच्या जनाबाई हिरवे हिने महिला गटात विजेतेपद मिळविले. नेसरीच्या कोळेकर महाविद्यालयाच्या पुरुष संघाने क्रॉसकंट्री स्पर्धेत सांघिक विजेतेपद मिळवित हॅट्ट्रिक नोदविली. मुलींत शिवराज कॉलेज, गडहिंग्लजने सांघिक विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतून १५ जणांची कोलकाता येथे होणार्‍या ऑल इंडिया क्रॉसकंट्रीसाठी निवड झाली आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठस्तरीय आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत आज, गुरुवारी नेसरीच्या टी. के. कोळेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अंकुश पारखेने पुरुष गटात विजेतेपद मिळविले, तर वाईच्या किसनवीर महाविद्यालयाच्या जनाबाई हिरवे हिने महिला गटात विजेतेपद मिळविले. नेसरीच्या कोळेकर महाविद्यालयाच्या पुरुष संघाने क्रॉसकंट्री स्पर्धेत सांघिक विजेतेपद मिळवित हॅट्ट्रिक नोदविली. मुलींत शिवराज कॉलेज, गडहिंग्लजने सांघिक विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतून १५ जणांची कोलकाता येथे होणार्‍या ऑल इंडिया क्रॉसकंट्रीसाठी निवड झाली आहे.
विद्यापीठाच्या नूतन सिंथेटिक ट्रॅकवर प्रथमच झालेल्या या क्रॉसकंट्री स्पर्धेचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी अजित बी. पवार यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून करण्यात आले, तर विजेत्यांना कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्‘ांतील ६८ महाविद्यालयांतील पुरुष गटात एकूण १६३ स्पर्धक, तर महिला गटात ६१ स्पर्धक सहभागी झाले होते. पुरुषांसाठी १२.५ किलोमीटर, तर महिलांसाठी ६ किलोमीटर अंतर होते.
बक्षीस वितरणप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील यांच्यासह क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित होते. बिद्रीचे प्रा. नंदू पाटील डॉ. एस. एस. हुंसवाडकर, डॉ. दीपक पाटील-डांगे, विजय रोकडे, रामा पाटील, किरण पाटील, शरद बनसोडे, एन. डी. पाटील, सुरेश फराकटे, दीपक पाटील, आय. एच. मुल्ला, महेश पाटील, प्रशांत पाटील, आदी उपस्थित होते.
-----------------------------
स्पर्धेचा निकाल असा :
पुरुष सांघिक विजेतेपद : १) टी. के. कोळेकर आर्टस ॲँड कॉमर्स कॉलेज, नेसरी, २) राजे रामराव महाविद्यालय, जत, ३) शिवराज कॉलेज, गडहिंग्लज ४) यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी ५) कर्मवीर हिरे कॉलेज, गारगोटी, ६) राजे शिवछत्रपती कॉलेज, महागाव, ७) किसन वीर महाविद्यालय, वाई, ८) लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा.
महिला सांघिक विजेतेपद : शिवराज कॉलेज, गडहिंग्लज, २) टी. के. कोळेकर आर्टस ॲँड कॉमर्स कॉलेज, नेसरी ३) बी.व्ही.एम.बी.एस. के. कन्या महाविद्यालय, कडेगाव, ४) राजे रामराव महाविद्यालय, जत, ५) आर्टस कॉलेज, कोवाड, ६) यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी, ७) श्रीमती आर. एन. पी. कन्या महाविद्यालय, सांगली
-------------------------
अनुक्रमे पुरुष (वैयक्तिक) विजेते : अंकुश पारखे (टी. के. कोळेकर आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, नेसरी), संदीप शेळके (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर ), विक्रम शिंदे ( वेणूताई चव्हाण कॉलेज, कर्‍हाड), ४) राजू चव्हाण ( एस. एम. डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज, मिरज), ५) अमोल साळुंखे (एन. डी. पाटील नाईट कॉलेज, सांगली), ६) भैरवनाथ यादव (आर्टस, कॉमर्स कॉलेज, सातारा), ७) सुनील कुडाळे (कर्मवीर हिरे कॉलेज, गारगोटी), ८) महादेव यमगर ( के. डब्ल्यू. कॉलेज, सांगली), ९) बसवराज नाईक (राजा छत्रपती कॉलेज, महागाव).
-------------
महिला (वैयक्तिक) विजेते :
जनाबाई हिरवे (किसन वीर महाविद्यालय, वाई), सुषमा शेवाळे (डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज), ऐश्वर्या कदम (शिवराज कॉलेज, गडहिंग्लज), शीतल तोडकर (डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज), साधना कराडे (शिवराज कॉलेज, गडहिंग्लज), कोमल ऐवळे (के. डब्ल्यू. कॉलेज, सांगली). वैयक्तिक विजेतेपदामधील ९ पुरुष, तर ६ महिलांची तमिळनाडू येथे होणार्‍या ऑल इंडिया क्रॉसकंट्रीसाठी निवड झाली आहे.
----------
सिंगल फोटो
११ कोल - जनाबाई हिरवे
११ कोल - सुषमा शेवाळे
११ कोल - ऐश्वर्या कदम
११ कोल - अंकुश पारखे
११ कोल - संदीप शेळके
११कोल - विक्रम शिंदे
------------------
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात गुरुवारी विद्यापीठस्तरीय आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी महिला स्पर्धेतील क्षण. ११ कोल - एसयुके ०१, ०२
---------------
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात गुरुवारी विद्यापीठस्तरीय आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभागी पुरुष स्पर्धेतील क्षण. ११ कोल - एसयुके ०३
(सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)