शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

अनिर्बान लाहिरी, चौरासिया करणार भारताचे प्रतिनिधित्व

By admin | Updated: July 13, 2016 03:13 IST

आॅलिम्पिकच्या धूमधडाक्याला काही दिवस शिल्लक असून, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये विशेष लक्ष असेल ते गोल्फ खेळाकडे.

नवी दिल्ली : आॅलिम्पिकच्या धूमधडाक्याला काही दिवस शिल्लक असून, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये विशेष लक्ष असेल ते गोल्फ खेळाकडे. तब्बल ११२ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर गोल्फची पुन्हा एकदा आॅलिम्पिक एंट्री झाली आहे. भारतानेदेखील या खेळामध्ये पदक जिंकण्यासाठी कंबर कसली असून, अनुभवी अनिर्बान लाहिरी आणि एसएसपी चौरासिया हे आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्याचप्रमाणे युवा खेळाडू अदिती अशोक ही महिला गटात भारतासाठी पदक जिंकण्याचा प्रयत्न करेल.गोल्फसाठी ११ जुलै ही आॅलिम्पिक पात्रतेची अखेरची तारीख होती. यानंतर लाहिरी आणि चौरासिया यांनी आंतरराष्ट्रीय गोल्फ महासंघाच्या (आयजीएफ) क्रमवारीनुसार रिओ तिकीट निश्चित केले. आशियाचा अव्वल गोल्फर असलेला लाहिरी जागतिक क्रमवारीत ६२व्या स्थानी आहे, तर विद्यमान इंडियन ओपन चॅम्पियन चौरासिया जागतिक क्रमवारीत २०७व्या स्थानी आहे. त्याच वेळी आयजीएफच्या क्रमवारीत दोघेही अनुक्रमे २०व्या आणि ४५व्या स्थानी आहेत. त्यामुळे आॅलिम्पिकसाठी दोघांनीही पात्र ठरलेल्या पहिल्या ६० खेळाडूंमध्ये आपली जागा निश्चित केली.लाहिरीने याआधी २००६ साली दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सांघिक रौप्य पटकावण्यात मोलाचे योगदान दिले. त्याच वेळी एकूण ४ आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावलेल्या चौरासियाने यंदाच्या वर्षी इंडियन ओपन किताबवर कब्जा करून आॅलिम्पिकवारी निश्चित केली. (वृत्तसंस्था)लाहिरीने २०१५ साली युरोपियन टूरमध्ये दोन विजय मिळवताना पीजीए चॅम्पियनशिपमध्ये संयुक्तपणे पाचवे स्थान मिळवले होते. गेल्या वर्षी लाहिरीने प्रेसिडेंट कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा पहिला भारतीय म्हणून इतिहास रचला होता.या आठवड्यात लाहिरी स्कॉटलंड येथे ब्रिटिश ओपन गोल्फ स्पर्धा खेळणार असून, ही स्पर्धा लाहिरीची सलग नववी मुख्य स्पर्धा असेल. चौरासियाने एकूण ४ आंतरराष्ट्रीय विजेतेपदांसह स्वत:ची छाप पाडली आहे. ४ पैकी ३ विजेतेपद युरोपियन टूरमध्ये पटकावली.विद्यमान आंतरराष्ट्रीय गोल्फ क्रमवारीनुसार आॅलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गटात एकाहून अधिक खेळाडू सहभागी होणाऱ्या २४ देशांमध्ये भारताचा समावेश.रिओ आॅलिम्पिकमध्ये आशियातील ९ देशांमधून एकूण १७ गोल्फर खेळणार.