शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

अँडी मरे, निशिकोरी यांची धमाकेदार सलामी

By admin | Updated: November 16, 2016 00:00 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ब्रिटनचा अँडी मरे आणि पाचव्या क्रमांकावरील जपानचा केई निशिकोरी यांनी वर्षातील अखेरच्या एटीपी

लंडन : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ब्रिटनचा अँडी मरे आणि पाचव्या क्रमांकावरील जपानचा केई निशिकोरी यांनी वर्षातील अखेरच्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत धमाकेदार विजयी सलामी दिली. दोन्ही खेळाडूंनी आपआपल्या लढतीमध्ये सहज बाजी मारताना आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मरेने आपला धडाका कायम राखताना क्रोएशियाच्या मारिन सिलिचचा ६-३, ६-२ असा फडशा पाडला. विशेष म्हणजे मरेचा हा सलग २० वा विजय आहे. जर का मरेने आणखी चार विजय मिळवले, तर या वर्षाअखेरीस जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू म्हणून तो निरोप घेईल. मरेच्या धडाकेबाज खेळापुढे सिलिचचा काहीच निभाव लागला नाही. पहिल्या सेटमध्ये काहीसा प्रतिकार केल्यानंतर सिलिचने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमनाचे प्रयत्न सोडले.दुसरीकडे, निशिकोरीने दणदणीत बाजी मारताना स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाचा ६-२, ६-३ असा धुव्वा उडवला. या शानदार विजयासह निशिकोरीने यूएस ओपन स्पर्धेत वावरिंकाकडून मिळालेल्या पराभवाचा वचपा देखील काढला. जॉन मॅकेन्रो गटात झालेल्या या सामन्यात विजयी झाल्यानंतर निशिकोरीचा पुढील सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अँडी मरेविरुद्ध होईल. त्याचबरोबर, या सामन्यानंतर निशिकोरीला माजी यूएस विजेता सिलिचविरुध्दही दोन हात करायचे आहेत. २०१४ साली या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत निशिकोरीने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. तर, वावरिंकाने गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली आहे. (वृत्तसंस्था)