शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

मरेकडून आंद्रियस पराभूत

By admin | Updated: July 6, 2015 01:26 IST

ब्रिटनचे आशास्थान असलेल्या तृतीय मानांकित अँडी मरे याने इटलीच्या आंद्रियस सेपीचे कडवे आव्हान आणि खांद्याची दुखापत या दोन्हीवर मात करुन विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

लंडन : ब्रिटनचे आशास्थान असलेल्या तृतीय मानांकित अँडी मरे याने इटलीच्या आंद्रियस सेपीचे कडवे आव्हान आणि खांद्याची दुखापत या दोन्हीवर मात करुन विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. शनिवारी २ तास ७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात मरेने सेपीला ६-२, ६-२, १-६, ६-१ असे हरविले. मरेने पहिले दोन सेट आरामात जिंकले. परंतु तिसऱ्या सेटमध्ये त्याने १-६ अशी आश्चर्यजनक हाराकिरी केली. परंतु यातून सावरत या ब्रिटीश खेळाडूने जबरदस्त प्रदर्शन करीत इटलीच्या खेळाडूला ६-१ असे फटकावले. मरेने सामन्यात १० एस आणि ३२ विनर्स लगावले. त्याने १२ पैकी ७ ब्रेकपॉर्इंट, तर सेपीने १० पैकी ३ ब्रेकपॉर्इंट वाचविले. २०१३ सालचा चॅम्पियन असलेल्या मरेला सामन्यात खांदेदुखीने सतावले. यामुळे त्याला ४० मिनिटे कोणताही गेमपॉर्इंट जिंकता आला नव्हता. चौथ्या सेटमध्ये त्याला आपल्या खांद्यावर इलाज करुन घ्यावा लागला. सलग सहा गेम गमावणाऱ्या २८ वर्षीय मरेने त्यानंतर मग सलग सहा गेम जिंकत सामना संपविला. सन २०१३ मध्ये विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद जिंकून ब्रिटनचा ७५ वर्षांचा दुष्काळ संपविणाऱ्या मरेची चौथ्या फेरीतील सामन्यात क्रोएशियाच्या इवो कालोेंविच याच्याशी होणार आहे. त्याने फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाला ७-६, ४-६, ७-६, ७-६ असा पराभव केला आहे.महिला एकेरीत गतविजेती चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवाला तिसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. द्वितीय मानांकित क्वितोवाला २८व्या मानांकित सर्बियाच्या येलेना यांकोविचने ३-६, ७-५, ६-४ असे हरविले. यांकोविचा पुढील सामना पोलंडच्या एग्निस्का रदवांस्का विरुध्द होईल. रविवारच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा सामने सुरू होतील. सहाव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डीचने स्पेनच्या पाब्लो एंदुजार याला ४-६, ६-०, ६-३ असे हरवून चौथ्या फेरीत स्थान मिळविले. ‘हॉक-आय’वर फेडररची वक्रदृष्टी> जागतिक द्वितीय मानांकित आणि १७ वेळेचा ग्रँडस्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर विम्बल्डन स्पर्धेतील ‘हॉक-आय’ प्रणालीवर नाराज आहे. > फेडररने सांगितले, रात्री होणाऱ्या सामन्यात ही प्रणाली कुचकामी ठरत आहे, त्यामुळे जे सामने रात्री उशिरापर्यंत चालू शकतात त्यांना थांबविणेच योग्य ठरेल. > मरेने शनिवारी २ तास ७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात मरेने सेपीला ६-२, ६-२, १-६, ६-१ असे हरविले.च्सामन्यात १० एस आणि ३२ विनर्स लगावले. त्याने १२ पैकी ७ ब्रेकपॉर्इंट, तर सेपीने १० पैकी ३ ब्रेकपॉर्इंट वाचविले.पेसची मिश्र दुहेरीत आगेकूचलंडन : लिएंडर पेस व स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी मिश्र दुहेरीत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे; परंतु रोहन बोपण्णा व स्पेनची त्याची जोडीदार मारिया जोस मार्टिनेज सांचेज यांना पराभवाचा सामना करावा लागला. पेस - हिंगीस या सातव्या मानांकित जोडीने शनिवारी रात्री झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत एडुआर्डो रॉजर वेसलिन - एलाइज कार्नेट या फ्रान्सच्या जोडीला ६-४, ६-२ असे नमवले. त्यांची पुढील लढत न्यूझीलंडच्या आर्टेम सिताक व आॅस्ट्रेलियाची एनस्तेसिया रोडयानोवा विरुध्द होईल.