कोलकाता : ‘तुने मारी एन्ट्री, और दिल मे बजी घंटी...’ असाच उल्लेख इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) उद्घाटन समारंभाचा करावा लागेल. ७० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियम रविवारी खचाखच भरले होते. भारतात फुटबॉलची घडत असलेल्या क्रांतीचे साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी कोलकातावासीयांना गमवायची नव्हती. मग, सेलेब्रिटीही ही संधी कशी सोडतील. बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, परिणीती चोपरा तसेच मास्टर लास्टर सचिन तेंडुलकर, प्रिन्स आॅफ कोलकाता सौरव गांगुली हे क्रिकेट लीजंड, तर रिलायन्सचे मुकेश व नीता अंबानी आदी मान्यवरांच्या आणि पशिचम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. मुंबई, पुणे, गोवा, चेन्नई, कोची, कोलकाता, दिल्ली आणि गुवाहाटी आदी शहरांच्या संघाचे संस्कृतीचे दर्शन देणारा हा ४५ मिनिटांचा उद्घाटन सोहळा होता. बॉलिवूड अभिनेत्री देसी गर्ल प्रियंका चोपरा हिच्या अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्यानंतर प्रियंकाने सर्व संघ मालकांना स्टेडियमवर आमंत्रित केले आणि आयोजक नीता अंबानी यांनी खास बंगाली भाषेत स्पर्धा सुरू होत असल्याची घोषणा केली. सचिन तेंडुलकरचे आगमन होताच प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे स्वागत केले.
...और दिल मे बजी घंटी
By admin | Updated: October 13, 2014 06:26 IST