शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीचे होणार विश्लेषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 08:37 IST

भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताच्या पदरी सर्वाधिक निराशा आली आहे. ज्या खेळामध्ये भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती, त्या नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठण्यातही भारतीयांना संघर्ष करावा लागला. त्यामुळेच आता भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रकरणी तीन भागात समीक्षा होणार असून, यास याआधीच सुरुवात झाल्याची माहिती एनआरएआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. रिओ ऑलिम्पिक (२०१६) स्पर्धेत नेमबाजांच्या पदकांची झोळी रिकामी राहिल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमधूनही भारतीय नेमबाज रिकाम्या हाताने परतले. विशेष म्हणजे ऑलिम्पिकआधी झालेल्या विविध विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीयांनी पदकांची लयलूट करत सर्वांना इशारा दिला होता. मात्र, ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना विश्वचषक स्पर्धेतील लय मिळवता आली नाही.एनआरएआयच्या सूत्राने सांगितले की, ‘नेमबाजांच्या कामगिरीचे विश्लेषण सुरू झाले आहे. सर्वांत आधी खेळाडू, नंतर प्रशिक्षक व सहयोगी स्टाफ आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामगिरीची चौकशी होईल.’ एनआरएआय अध्यक्ष रनिंदर सिंग यांच्याही कामगिरीचे विश्लेषण होणार असल्याचे संकेतही सूत्राने यावेळी  दिले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021