शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अमरहिंद शालेय खोखो : महात्मा गांधी विद्यामंदिरला दुहेरी विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 21:01 IST

महात्मा संघाच्या मुलींनी सेंट इझाबेल स्कूलचा एक डाव व ६ गुणांनी धुव्वा उडविला.

मुंबई : अमर हिंद मंडळ-दादरतर्फे वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतर शालेय खोखो स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिरने  मुलांचे व मुलींचे असे दुहेरी विजेतेपद पटकाविताना प्रतिस्पर्ध्यावर निर्विवाद वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मुलांनी डॉ. शिरोडकर हायस्कूलचा एक डाव व ४ गुणांनी तर महात्माच्या मुलींनी सेंट इझाबेल स्कूलचा एक डाव व ६ गुणांनी धुव्वा उडविला. महात्मा गांधी विद्यामंदिरच्या अद्वितीय कामगिरीत धीरज भावे, गणेश हेगरे, रामचंद्र हेगरे, अर्जुन अनिवसे आणि काजल गायकवाड, मुस्कान नाईक, साक्षी वाकेळकर, सिद्धी हिंदळेकर यांचा खेळ प्रमुख ठरला.

      दादर-पश्चिम येथील अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर मुलांच्या निर्णायक सामन्यात महात्मा गांधी विद्यामंदिरच्या धीरज भावे (३.१० मि. व २ गडी), गणेश हेगरे (नाबाद १.५०, १.५० मि. व २ गडी), रामचंद्र हेगरे (२.२०, ३.४० मि. व १ गडी) व अर्जुन अनिवसे (१.४० मि. व ३ गडी) यांचा अष्टपैलू खेळ थोपविताना डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या खेळाडूंची आक्रमणात व संरक्षणात पुरती दमछाक झाली. परिणामी महात्मा गांधी विद्यामंदिरने एक डाव राखून ९-५ असा शानदार विजय संपादन केला. अंतिम उपविजेत्या डॉ. शिरोडकरच्या प्रतिक घाणेकर (१.५० मि.) व निखील पाडावे (१.५० मि.) यांनी पळतीचा छान खेळ केला.

   मुलीच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्या मंदिरच्या काजल गायकवाडचा दमदार ५.५० मिनिटे पळतीचा खेळ, साक्षी वाकेळकरच्या झंझावाती आक्रमणात गारद झालेले ४ गडी आणि मुस्कान नाईक (नाबाद १.५०, २.१० मि. व २ गडी) व सिद्धी हिंदळेकर (नाबाद २.३० मि. व १ गडी) यांचा अष्टपैलू खेळ यामुळे सेट इझाबेल स्कूलच्या मुलींना प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलवले नाही. त्यामुळे महात्मा गांधी विद्या मंदिरने एक डाव राखून ९-३ असा मोठा विजय प्राप्त केला आणि विजेतेपदासह दुहेरी मुकुट पटकाविला. अंतिम उपविजेत्या सेंट इझाबेलच्या आर्या तावडे (२.२० मि. व १ गडी) व श्रावणी पवार (१.३० मि.) यांनी छान खेळ केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडाप्रेमी डॉ. विकास राजाध्यक्ष, अमरहिंद मंडळाचे कार्याध्यक्ष अरुण देशपांडे, सेक्रेटरी दीपक पडते, प्रफुल पाटील, संजय पेडणेकर, विजय राणे आदी मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

टॅग्स :Kho-Khoखो-खोMumbaiमुंबई