शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरहिंद शालेय कबड्डी: शारदाश्रमवर गौरीदत्त संघाचा निसटता विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 20:17 IST

आयईएस नाबर गुरुजी हायस्कूलने साहिल टिकेकरच्या अष्टपैलू खेळामुळे सोशल सर्व्हिस लीग स्कूलचे आव्हान २२-१४ असे संपुष्टात आणले.

मुंबई : शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक शाळेकडे पहिल्या डावात २ गुणांची आघाडी असतांना देखील प्रतिस्पर्धी गौरीदत्त मित्तल हायस्कूलने उत्तरार्धात ४०-३८ असे चकविले आणि अमर हिंद मंडळ- दादर आयोजित आंतर शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत गौरीदत्त मित्तल हायस्कूलने प्रवेश केला. गौरीदत्तचा निखील शर्मा विरुद्ध शारदाश्रमचा शुभम यादव यांच्या चढाईमधील जुगलबंदीने सामना रंगला. अन्य सामन्यात आयईएस नाबर गुरुजी हायस्कूल, डॉ. अँटोनियो डासिल्वा टेक्निकल हायस्कूल, आनश एज्युकेशन स्कूल, शारदाश्रम विद्यामंदिर मराठी शाळा, राजा शिवाजी विद्यालय आदी शालेय संघानी विजयी आगेकूच केली.

   दादर-पश्चिम येथील अमरहिंद क्रीडांगणामधील दुसऱ्या कबड्डी सामन्यात आयईएस नाबर गुरुजी हायस्कूलने साहिल टिकेकरच्या अष्टपैलू खेळामुळे सोशल सर्व्हिस लीग स्कूलचे आव्हान २२-१४ असे संपुष्टात आणले. उशिरा सूर सापडलेल्या अभिजित नेमणने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा दुसऱ्या डावात अधिक दोन गुण मिळविण्यात महत्वाची कामगिरी करूनही सोशल सर्व्हिसला मध्यंतराची ३-१३ अशी १० गुणांची पिछाडी भारी पडली. डॉ. अँटोतोनियो डासिल्वा टेक्निकल हायस्कूलने साहिल सारंगच्या अप्रतिम खेळामुळे श्री हशू अडवाणी हायस्कूलचा ४६-३२ असा पराभव केला. अडवाणी हायस्कूलचा अष्टपैलू कुंज पटेलची लढत एकाकी ठरली.

    आनश एज्युकेशन स्कूलने मध्यंतराला घेतलेल्या ८ गुणांच्या आघाडीमुळे शारदाश्रम विद्यामंदिर इंग्रजी माध्यमिक शाळेला ३७-३६ अशा फक्त एका गुणाच्या फरकाने पराभूत केले. आनशतर्फे रोहितने तर शारदाश्रम तर्फे सुजल देशमुखने चढाईत चमक दाखविली. शारदाश्रम विद्यामंदिर मराठी शाळेने चढाईपटू कल्पेश भोसलेच्या खेळामुळे बालमोहन विद्यामंदिरचा ३५-१८ असा; मारवाडी विद्यालयाने चढाईपटू मोहित शर्माच्या खेळामुळे श्री गणेश विद्यालयचा ५१-२४ असा तर राजा शिवाजी विद्यालयाने चढाईपटू यश बागलच्या खेळामुळे पीपल्स एज्युकेशन हायस्कूलचा ३७-२१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.  

टॅग्स :Kabaddiकबड्डी