शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

ऑल स्टार क्रिकेट, वॉर्न वॉरियर्सने दिला सचिन ब्लास्टर्सला व्हाईट वॉश

By admin | Updated: November 15, 2015 12:50 IST

ऑल स्टार्स क्रिकेट टी -२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात वॉर्न वॉरियर्सने सचिन ब्लास्टर्सवर चार गडी राखून विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश मिळवले.

 ऑनलाइन लोकमत 

लॉस एंजेल्स, दि. १५ - ऑल स्टार्स क्रिकेट टी -२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात वॉर्न वॉरियर्सने सचिन ब्लास्टर्सवर चार गडी राखून विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश मिळवले. सचिनने २७ चेंडूत ५६ धावांची खेळी केली असली तरी सामन्यात विजय मिळवण्यात सचिन ब्लास्टर्सला अपयशच आले. 

ख्यातनाम माजी क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या ऑल स्टार्स क्रिकेट टी - २० मालिकेतील तिसरा व अंतिम सामना अमेरिकेतील लॉस एंजेल्समध्ये रंगला. सचिन तेंडुलकरच्या सचिन ब्लास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिन व सेहवाग या सलामीच्या जोडीने संघाला दमदार अर्धशतकी सुरुवात करुन दिली. सेहवाग २७ धावांवर बाद झाल्यावर सचिनने धडाकेबाज खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. सचिन ५६ धावांवर बाद झाल्यावर जयवर्धनेने १८ चेंडूत ४१ तर गांगुलीने ३७ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तर हूपरने २२ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. सचिन ब्लास्टर्सने २० षटकांत ५ विकेट गमावत २१९ धावा केल्या. वॉर्न वॉरियर्सतर्फे व्हिटोरीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 

सचिन ब्लास्टर्सच्या २२० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या शेन वॉर्नच्या वॉर्न वॉरियर्सची सुरुवात फारशी चांगली नव्हती. अॅम्ब्रोजने पहिल्याच चेंडूवर मायकल वॉनला त्रिफळाचित केले. यानंतर सायमंड्सने १९ चेंडूत ३१ धावा केल्या. मा६ संघाच्या ५० धावा झाल्या असतानाच सायमंड्स बाद झाला. मॅथ्यू हॅडनही स्वस्तात तंबूत परतला. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यावर वॉर्न वॉरियर्सची मदार कुमार संगकारावर होती. त्याने २१ चेंडूत ४२  धावा केल्या. संगकारा बाद झाल्यावर सचिन ब्लास्टर्सच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र त्यानंतर  रिकी पॉटींग व जॅक कॅलिसने सहाव्या विकेटसाठी ८८ धावांची खेळी करत संघाला विजयाच्या समीप नेले. कॅलिसने ४७ तर पॉटिंगने नाबाद ४३ धावांची खेळी केली. वॉर्न वॉरियर्सने चार गडी व एक चेंडू राखून सचिन ब्लास्टर्सवर विजय मिळवला. कॅलिसला सामनावीराचा तर संगकाराला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.