शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अष्टपैलू बेनचा तडाखेबंदशतकी ‘स्ट्रोक’

By admin | Updated: May 2, 2017 01:32 IST

जयदेवे उनाडकट (३/२९), इम्रान ताहिर (३/२७) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर बेन स्टोक्सने ६३ चेंडूत ७ चौकार व ६ षटकार

शिवाजी गोरे / पुणेजयदेवे उनाडकट (३/२९), इम्रान ताहिर (३/२७) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर बेन स्टोक्सने ६३ चेंडूत ७ चौकार व ६ षटकार ठोकून झळकावलेले आक्रमक नाबाद शतक व महेंद्रसिंह धोनीची महत्वपूर्ण खेळी याजोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटने गुजरात लायन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. एमसीए स्टेडियमवर झालेल्या लढतीत पुणे संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गूजरात लायन्सने दिलेल्या १६२ धावा आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या पुणे संघाची सुरूवात खराब झाली. प्रदिप सागवानच्या पहिल्याच षटकात पुण्याचे तीन भरवशाचे फलंदाज फलकावर १० धावा असताना तंबूत परतले. अजिंक्य रहाणे ४ धावा काढून पायचीत झाला. कर्णधार स्टिव्ह स्मिथ सुध्दा ४ धावा काढून अंकित सोनीच्या हाती झेलबाद झाला. पुढच्या षटकात मनोज तिवारी शून्यावर बसिल थम्पीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पुण्याची अवस्था बिकट असतानाच सहाव्या षटकात राहूल त्रिपाठीला ६ धावांवर फिंचने धावबाद केले. ४ बाद ४२ अशी परिस्थिती असताना बेन स्टोक्स आणि महेंद्रसिंह धोनी मैदानावर होते. त्यांना संघाची पडझड थांबविली, पण दुसरीकडे धावफलक सुध्दा हालता ठेवला. एकीकडे बेन फटकेबाजी करीत असताना धोनी त्याला साथ देत होता. बेनने ३८ चेंडूत ३ चौकार व ३ षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले. स्टोक्सच्या जोरावर पुण्याने एक चेंडू राखून ५ बाद १६७ धावा काढून विजय निश्चित केला.१७ व्या षटकात थम्पीच्या गोलंदाजीवर धोनीने मिड आॅफला उंच मारलेला चेंडू सीमा रेषेवर मॅक्क्युलमने सहज झेल घेतला. त्याने २६ धावा काढताना३३ चेंडूत १ चौकार व १ षटकार मारला. बेन आरि धोनीने पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर बेनने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेण्यास सुरूवात केली. त्याने आपले शतक ६१ चेंडूत ७ चौकार व ६ षटकात मारून पूर्ण केले. दुसरीकडे ख्रिस्टियनने ८ चेंडूत १ चौकार व १ षटकार मारून नाबाद १७ धावा केल्या. गुजरातकडून सांगवान व थम्पीने प्रत्येकी दोन बळी घेतले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना गुजरातच्या डावाची सुरूवात इशान किशन आणि ब्रॅडन मॅक्क्युलम यांनीकेली. जयदेव उनाडकटच्या पहिल्याच षटकात एक धाव किशनने काढल्यानंतर मॅक्क्युलमने जयदेवला एक चौकार व एक षटकार ठोकला. गुजरातच्या ५० धावा ५.३ षटकात लागल्या, त्यावेळी किशन ३२ तर मॅक्क्युलम २३ धावांवर खेळत होते. स्टिव्ह स्मिथने पाचवे षटक टाकण्यासाठी इम्रान ताहिरला आणले आणि त्याने किशनला सुंदर वॉशिंग्टनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. यानंतर कर्णधार सुरेश रैनाही जास्त वेळ टिकला नाही. आठव्या षटकात ताहिरच्या गोलंदाजीवर रहाणेने रैनाला ८ धावांवर धावबाद केले. रैना बाद झाल्यावर फिंचला सुध्दा ताहिरने १३ धावांवर स्व:ताच्या गोलंदाजीवर झेल घेऊन बाद केले. या षटकात ताहिरने दोन विकेट गेतल्या. दिनेश कार्तिक (२९) आणि रविंद्र जडेजा (१९) हे दोघेच काही वेळ टिकून राहिले. जडेजाला क्रिस्टियनने बाद केल्यानंतर जेम्स फॉल्कनर (६), प्रदिप सांगवान (१), अंकित सोनी (०) लवकर बाद झाले. गुजरातचा डाव १९.५ षटकात १६१ धावात संपुष्टात आला.मुख्य खेळपट्टीचा वापर.... एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या मैदानावर असलेल्या एकूण १५ खेळपट्टया पैकी रविवारी गुजरातविरूध्द मध्यभागी असलेली ८ नंबरची मुख्य खेळपट्टी वापरण्यात आली. या मैदानावर झालेल्या पाच लढतीसाठी ७ व ९ क्रमांकाच्या खेळपट्ट्यांचा वापर करण्यात आला होता. या खेळपट्टीवर या आयपीएल १० सत्रात एकही सामना खेळविण्यात आला नव्हता. संक्षिप्त धावफलकगुजरात लायन्स : १९.५ षटकात सर्वबाद १६१ धावा (ब्रेंडन मॅक्क्युलम ४५, इशान किशस ३१, दिनेश कार्तिक २९; इम्रान ताहिर ३/२७,जयदेव उनाडकट ३/२९) पराभूत वि. रायझिंग पुणे सुपरजायंट : १९.५ षटकात५ बाद १६७ धावा (बेन स्टोक्स नाबाद १०३, महेंद्रसिंग धोनी २६; बसिल थम्पी २/३५,प्रदिप सांगवान २/३८)