शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑल इंग्लंड बॅडमिंटन: सिंधू उपांत्य फेरीत पराभूत; रंगतदार लढतीत पोर्नपावी चोचुवोंगने नमविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 04:50 IST

सिंधूचा उपांत्य लढतीपूर्वी २३ वर्षीय चोचुवोंगविरुद्ध विजयाचा रेकॉर्ड ४-१ असा होता. तिला तिने जानेवारीमध्ये एचएसबीसी बीडब्ल्यूएफ टूर फायनल्समध्ये पराभूत केले होते.

बर्मिंघम : गत विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यफेरीत पराभव स्वीकारावा लागला. शनिवारी महिला एकेरीत थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगविरुद्ध तिला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला तिच्यापेक्षा युवा व जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकाची खेळाडू चोचुवोंगच्या चपळ व अचुकतेची बरोबरी साधता आली नाही. ४३ मिनिटे रंगलेल्या या लढतीत सिंधूला १७-२१, ९-२१ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिंधूला २०१८ ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्येही उपांत्यफेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. 

सिंधूचा उपांत्य लढतीपूर्वी २३ वर्षीय चोचुवोंगविरुद्ध विजयाचा रेकॉर्ड ४-१ असा होता. तिला तिने जानेवारीमध्ये एचएसबीसी बीडब्ल्यूएफ टूर फायनल्समध्ये पराभूत केले होते. पण, चोचुवोंगच्या शानदार बचावापुढे या आकडेवारीला अर्थ उरला नाही. त्याआधी, शुक्रवारी रात्री पाचव्या मानांकित सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तिसऱ्या मानांकित अकाने यामागुचीचा १६-२१, २१-१६, २१-१९ने पराभव करत उपांत्यफेरी गाठली होती. 

पाचव्या मानांकित सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करताना १६-२१, २१-१६, २१-१९ने विजय नोंदवला. एक तास १६ मिनिटे रंगलेल्या लढतीत विजय मिळवत सिंधूने दुसऱ्यांदा या स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश केला. यापूर्वी यामागुचीविरुद्ध सिंधूची कारकिर्दीतील कामगिरी १०-७ अशी होती, पण गेल्या तीन लढतींमध्ये तिला पराभव स्वीकारावा लागला होता. स्वीस ओपन फायनलमध्ये खेळणाऱ्या सिंधूने आक्रमक खेळ केला, पण पहिल्या गेममध्ये टाळण्याजोग्या चुकांचे मोल द्यावे लागले. यामागुचीने १७-११ आघाडी घेतली होती, पण सिंधूने पुनरागमन करताना अंतर १५-१८ असे केले. त्यानंतर यामागुचीने सलग गुण वसूल करत पहिला गेम जिंकला.दुसऱ्या गेममध्ये उभय खेळाडूंनी सुरुवातीला चुका केला. सिंधूने ६-२ अशी आघाडी घेतली त्यानंतर ८-४ अशी केली.

माझ्या मते आजचा दिवस तिचा होता. ती जो फटका मारत होती तो लाईनवर जात होता. मला काही करता आले नाही. मला चुकांवर नियंत्रण राखायला हवे होते, तर काही वेगळे घडले असते.ही चांगली लढत होईल, याची कल्पना होती. तिच्याकडे चांगले फटके आहेत.

तिसऱ्या गेममध्ये मी नियंत्रण कायम राखले आणि प्रशिक्षकांचेही सहकार्य लाभले. प्रत्येक गुण महत्त्वाचा होता कारण कुणीही जिंकू शकत होता. मी विजयी ठरल्यामुळे आनंद झाला.’‘मी प्रदीर्घ कालावधीनंतर तिच्याविरुद्ध खेळत होती. कदाचित २०१९ मध्ये अखेरची लढत खेळली होती. तिनेही बरीच मेहनत घेतली होती आणि ही लढत चांगली झाली. पहिल्या गेममध्ये मी अनेक चुका केल्या, पण दुसऱ्या गेममध्ये सावरले. सामन्यांत अनेक रॅली झाल्या आणि दुसरा गेम जिंकणे आवश्यक होते. तिसऱ्या गेममध्ये मी नियंत्रण कायम राखले आणि प्रशिक्षकांचेही सहकार्य लाभले. प्रत्येक गुण महत्त्वाचा होता कारण कुणीही जिंकू शकत होता. मी विजयी ठरल्यामुळे आनंद झाला.’  - पी. व्ही. सिंधू

 

 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू