शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक आशा जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2015 04:31 IST

गोलरक्षक सविता पुनियाने प्रतिस्पर्धी संघांचे अनेक हल्ले हाणून पाडले आणि तिच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने विश्व लीग सेमीफायनल्सच्या

एंटवर्प : गोलरक्षक सविता पुनियाने प्रतिस्पर्धी संघांचे अनेक हल्ले हाणून पाडले आणि तिच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने विश्व लीग सेमीफायनल्सच्या पाचव्या स्थानासाठी झालेल्या प्लेआॅफ लढतीत जपानवर १-0 अशी मात केली. त्यामुळे भारताच्या आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा जिवंत राहिल्या.भारताकडून विजयी गोल राणी रामपाल हिने १३ व्या मिनिटाला केला. वंदना कटारिया हिचा फटका जपानच्या गोलरक्षकाने रोखला; परंतु राणीने रिबाऊंडवर चेंडू गोलपोस्टमध्ये पोहोचवला. तथापि, भारतीय संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली ती सविता. जपानच्या स्ट्रायकर आणि भारताच्या गोलपोस्टदरम्यान सविता अभेद्य भिंतीसारखी राहिली. अंतिम क्वॉर्टरमध्ये जपानला ५ पेनल्टी कॉर्नर मिळाले; परंतु त्यानंतरही प्रतिस्पर्धी संघ सविताला चकवून एकही गोल करू शकले नाहीत.भारतीय संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली आणि सविताने ३६ वर्षांनंतर प्रथमच आॅलिम्पिकला पात्र ठरण्याच्या भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.वेलेंसिया स्पर्धेतून जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि चीन यांनी तीन आॅलिम्पिक कोटा मिळवले आहेत. या स्पर्धेतूनदेखील तीन संघांना आॅलिम्पिक कोटा मिळणार आहे. त्याचप्रमाणे आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाने आॅलिम्पिकमधील आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.गेल्या वर्षी भारताने इंचियोन आशियाई स्पर्धेत कास्यपदकाच्या लढतीत जपानला नमवले होते. या प्रेरणादायी कामगिरीमुळे भारतीय संघाने आजच्या सामन्यात आत्मविश्वासाने सुरुवात केली. भारताने सामन्याच्या १३ व्या मिनिटाला गोल केला. लिलिमा मिंजने चेंडू वंदनाकडे सोपवला आणि तिने डाव्या बाजूने आक्रमण केले. वंदनाचा रिव्हर्स फटका गोलरक्षक सकियो असानो हिने रोखला; परंतु रिबाऊंडवर राणी रामपालने गोल करीत भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.जपानला २0 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु हाजुकी नगाईचा डिफ्लेक्शन गोलपासून दूर राहिले. भारताला २५व्या मिनिटाला गोल करण्याचा गोल्डन चान्स मिळाला. तेव्हा प्रतिस्पर्धी २ डिफेंडरोंच्या समोर त्यांचे तीन स्ट्रायकर्स सर्कलमध्ये होते; परंतु वंदनाच्या दिशाहीन पासमुळे ही गोल करण्याची संधी दवडली गेली. मध्यंतराच्या आधी जपानला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु संघ गोल करू शकला नाही. जपानने उत्तरार्धात बरोबरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्यांना ३८ मिनिटाला चांगली संधीही मिळाली; परंतु डिफेंडर मोनिकाने प्रतिस्पर्ध्यांचे हल्ले परतवून लावले.सविताने एका जपानच्या खेळाडूचा एक फटका आपल्या शरीरावर घेतला आणि प्रतिस्पर्ध्यांचा हल्ला अपशयी ठरवला. मोनिकाला नंतर मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे जपानने दबदबा निर्माण केला; परंतु त्यांना गोल करता आला नाही.