शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

अल्काराझ दुसऱ्यांदा विम्बल्डन चॅम्पियन; 'ग्रँडस्लॅमचा चौकार', दिग्गज नोव्हाक जोकोविचचा उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 11:44 IST

सर्वियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अल्काराझने दिमाखात विम्बल्डन जेतेपद उंचावले.

विम्बल्डन : वयाच्या २१व्या वर्षीच स्पेनच्या कार्लोसअल्का राझने दुसरे विम्बल्डन जेतेपद पटकावताना एकूण चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. सर्वियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अल्काराझने दिमाखात विम्बल्डन जेतेपद उंचावले.

केवळ २ तास २७ मिनिटांमध्ये बाजी मारताना अल्काराझने जोकोविचला ६-२, ६-२, ७-६ (७-४) असे नमवले. जूनमध्ये उजव्या गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे जोकोविचच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, तरीही त्याने झुंजार खेळ करताना विक्रमी ३७व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली, रविवारी अंतिम सामन्यातही जोकोविच उजव्या गुडघ्यावर पट्टी बांधून खेळला. त्याच्या मर्यादित हालचालींचा अचूक अंदाज घेत अल्काराड़ाने नेटजवळ अप्रतिम ड्रॉप फटके मारत गुणांची वसुली केली. तसेच, काही वेगवान फोर हँड्सनेही त्याने जोकोला बेजार केले. जोकोला अनेकदा अल्कारााच्या वेगवान फटक्यांना परतावता आले नाही आणि यामुळे तो हतबलही झाला. 

पहिले दोन सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर जोकोने तिसऱ्या सेटमध्ये झुंजार खेळ केला. हा सेट ट्रायब्रेकरमध्ये गेल्यानंतरही जोकोविचने सुरुवातीच्या चार गुणांपर्यंत चांगली झुंज दिली. मात्र, यानंतर अल्काराझने मिळविलेली पकड न सोडता कार्लोस अल्काराझ जोकोविचला चुका करण्यास भाग पाडले.

राजकुमारी केट मिडलटन हिला अभिवादन

कर्करोगावर उपचार घेत असलेली ब्रिटनच्या वेल्सची राजकुमारी केट मिडलटन रविवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम लढत पाहण्यासाठी ऑल इंग्लंड क्लब येथे पोहोचली. तेव्हा चाहत्यांनी उभे राहून राजकुमारीला अभिवादन करत स्वागत केले. राजकुमारीच्या हस्ते अल्काराझ याला ग्रँडस्लॅम विजेतेपद देण्यात आले.

महत्त्वाचे

- वयाची २२ वर्ष पूर्ण होण्याआधीच दोनवेळा विम्बल्डन जिंकणारा अल्काराझ हा बोरिस बेकर आणि ब्योर्न बोर्ग यांच्यानंतरचा तिसरा टेनिसपटू ठरला.■ जोकोविचने २०१४ व २०१५ सालानंतर विम्बल्डनमध्ये रॉजरफेडररविरुद्ध अंतिम सामना खेळल्यानंतर पहिल्यांदाच एकाच खेळाडूविरुद्ध सलग दोन विम्बल्डन अंतिम सामने खेळले. ■ यंदाच्या मोसमात आतापर्यंत जोकोविचने पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेची अतिम फेरी गाठली होती.■ दिग्गज रॉजर फेडररच्या विश्वविक्रमी आठ विम्बल्डन जेतेपदांशी बरोबरी करण्यात जोकोविच पुन्हा अपयशी ठरला.