शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अक्षर पटेल, रैनाला संधी मिळणार?

By admin | Updated: January 2, 2015 02:10 IST

भारतीय संघ व्यवस्थापन आॅस्ट्रलियाविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीत फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि अनुभवी फलंदाज सुरेश रैनाला संधी देण्याची शक्यता आहे़

सिडनी : भारतीय संघ व्यवस्थापन आॅस्ट्रलियाविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीत फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि अनुभवी फलंदाज सुरेश रैनाला संधी देण्याची शक्यता आहे़ फॉर्मशी झगडणारा शिखर धवन संघातून बाहेर होऊ शकतो़ संघात यष्टीरक्षक म्हणून रिद्धिमान साहा यांची निवड निश्चित मानली जात आहे़ सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर तिसऱ्या दिवशी खेळपट्टीवर चेंडू टर्न होतो़ त्यामुळे फिरकी गोलंदाज आऱ अश्विनसह अक्षर पटेलचा संघात समावेश होऊ शकतो़ पटेलला दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे़ अक्षरने ९ वन-डे सामन्यांत यापूर्वी भारताने प्रतिनिधित्व केले आहे़ विशेष म्हणजे यापैकी ५ लढतीत कोहलीच संघाचा कर्णधार होता़ त्यामुळे कोहली शंभर टक्के अक्षरला संधी देईल, हे निश्चित आहे़ अक्षरने आतापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामन्यांत खेळताना ३८ बळी मिळविले आहेत़ चौथ्या कसोटीत अक्षरला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळाले, तर मोहंमद शमी किंवा उमेश यादव यांच्यापैकी एका गोलंदाजाला बाहेर बसावे लागणार आहे़ कारण भारतीय संघ चार गोलंदाजांसह खेळण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता आहे़ भारतासाठी फलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय आहे़ सलामीवीर फलंदाज शिखर धवनला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही़ त्याने आतापर्यंत ३ कसोटीत २७़८३ च्या सरासरीने केवळ १६७ धावांच केल्या आहेत़ त्यामुळे तोही संघातून बाहेर होऊ शकतो़ त्यामुळे के ़एल़ राहुल मुरली विजयसह डावाची सुरुवात करू शकतो़ विशेष म्हणजे राहुलचे एका सामन्यातून आकलन करू नये, असे मत महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले आहे़संघातून राहुललासुद्धा बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला, तर अजिंक्य रहाणे डावाची सुरुवात करू शकतो़ विशेष म्हणजे मुंबईकडून रणजित डावाची सुरुवात करण्याचा त्याला अनुभव आहे़ अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनाही संघात संधी मिळू शकते़संघ व्यवस्थापनाने धवन किंवा राहुल यांच्यापैकी एकाला संधी दिली, तर रोहित किंवा रैना यापैकी एकाला संधी मिळेल़ रोहित विदेशात आतापर्यंत स्वत:ला सिद्ध करू शकला नाही़ तसेच रैनाला पहिल्या तीनही सामन्यांत संधी मिळाली नव्हती़ त्यामुळे अखेरच्या सामन्यात तो खेळू शकतो़ (वृत्तसंस्था)उपकर्णधारपदासाठी चुरस नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी याने कसोटीतून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे विराट कोहलीची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि फिरकी गोलंदाज आऱ आश्विन उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत़भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आणि संघाचे संचालक रवी शास्त्री ज्या दोन खेळाडूंपैकी एकाची उपकर्णधारपदी नियुक्ती करू इच्छिातात त्यामध्ये रहाणे आणि आश्विन यांचा समावेश आहे़सूत्रांच्या माहितीनुसार सध्या क्रिकेटच्या तीनही प्रकारांत खेळणारा रहाणे उपकर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे़ मात्र, आश्विन सिनिअर खेळाडू असल्यामुळे त्याच्याही नावाचा विचार होऊ शकतो़ रहाणे याने आतापर्यंत १३ कसोटीत १,०२६ धावा केल्या आहेत़ अल्पावधीत त्याने संघात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे़ या तुलनेत आश्विन सिनिअर खेळाडू असला तरी विदेश दौऱ्यात त्याला अंतिम एकादशमध्ये जागा मिळत नाही़ त्यामुळे रहाणेलाच उपकर्णधारपदासाठी पसंती मिळू शकते़