शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

अजय, प्रणय उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: July 2, 2016 05:50 IST

भारताच्या सहा खेळाडूंनी ५५ हजार डॉलर्स पुरस्कार राशी असलेल्या कॅनडा ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

कॅलगेरी : अजय जयराम व एच. एस. प्रणय यांच्यासह भारताच्या सहा खेळाडूंनी ५५ हजार डॉलर्स पुरस्कार राशी असलेल्या कॅनडा ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित जयरामने पुरुष एकेरीत आॅस्ट्रियाच्या डेव्हिड ओरनोस्टरेरचा २१-१०, २१-१२ने पराभव केला. त्याला पुढच्या फेरीत मायदेशाच्या हर्षिल दाणीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दाणी याने प्रतुल जोशीचा २१-९, २१-१८ ने पराभव केला. उपउपांत्यपूर्व फेरीतील अन्य एका लढतीत दुसऱ्या मानांकित एच. एस. प्रणय याने कॅनडाच्या बी. आर. संकीर्तची झुंज २१-१८, १८-२१, २१-१२ ने मोडून काढली. पुढच्या फेरीत त्याला सातवे मानांकन प्राप्त फ्रान्सचा खेळाडू ब्राईस लेव्हरडेजसोबत लढत द्यावी लागेल. मिश्र दुहेरीत मनू अत्री व पोनप्पा या भारतीय जोडीने कॅनडाच्या जोनाथन लेई व मिशेल तोंग यांचा २१-१४, २१-१२ ने पराभव केला. मनू अत्री व बी. सुमित रेड्डी या भारतीय जोडीला पुरुष दुहेरीत अव्वल मानांकित जोडी कॅनडाचा टेड चीन ताई चेन व चिनी ताइपेच्या चाओ सियांग यांच्यासोबत लढत द्यावी लागेल. रिओसाठी पात्र ठरलेल्या भारतीय जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत टिमोथी चियू व जेसन हो शुई या स्थानिक जोडीचा २१-८, २१-१० ने पराभव केला. (वृत्तसंस्था)महिला एकेरीत २०१५ ची राष्ट्रीय चॅम्पियन रुत्विका शिवानी गाडे हिने आॅस्ट्रियाच्या एलिझाबेथ बेलडॉफचा २४-२२, २१-१८ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रुत्विकाला पुढच्या फेरीत चौथ्या मानांकित बुल्गारियाच्या लिंडा जेचिरीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. अन्य लढतीत तन्वी लाडने अमेरिकेच्या माया चेनचा २१-१४, २१-१५ ने पराभव केला. तिला पुढच्या फेरीत तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या इरिस वांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीला महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत बाय मिळाला. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीला आॅस्ट्रेलियाच्या लीनी चू व कॅनडाच्या राचेल होंड्रिच या जोडीसोबत लढत द्यावी लागेल.