शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

अय्यरला आघाडीचे श्रेयस

By admin | Updated: February 26, 2016 03:58 IST

सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने (११७) केलेली शतकी खेळी व सूर्यकुमार यादवच्या (४८) उपयुक्त फलंदाजीने मुंबईने पहिल्या डावांत ८ बाद २६२ धावा करून पहिल्या

पुणे : सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने (११७) केलेली शतकी खेळी व सूर्यकुमार यादवच्या (४८) उपयुक्त फलंदाजीने मुंबईने पहिल्या डावांत ८ बाद २६२ धावा करून पहिल्या डावांत २७ धावांची आघाडी घेतली.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रणजी स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. सौराष्ट्राने पहिल्या डावांत दिलेल्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला दुसऱ्याच चेंडूवर झटका बसला. सलामीवीर फलंदाज अखिल हेडवारकरला (०) जयदेव उनादकटने शेल्डन जॅक्सनकरवी झेलबाद केले. पाठोपाठ भाविन ठक्करला त्रिफळाबाद करून उनादकटने दुसरा झटका दिला. त्यामुळे मुंबईची अवस्था १ बाद ० वरून २ बाद २३ अशी बिकट झाली. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरून मुक्त फलंदाजी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १५२ धावांची भागीदारी केली. श्रेयसने १४२ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांच्या साह्याने ११७ धावा फटकावल्या, तर सूर्यकुमारने ११२ चेंडूंत ७ चौकारांच्या साह्याने ४८ धावा केल्या. चिराग जानीने श्रेयसला अप्रीत वासवदाकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली. त्यानंतर ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. अभिषेक नायर (१९), धवल कुलकर्णी (१) व शार्दूल ठाकूर (०) यांना हार्दिक राठोडने किरकोळीत बाद केले. कुलकर्णी व ठाकूर ६४व्या षटकात पाठोपाठच्या चेंडूंवर तंबूत परतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिद्धेश लाड २२, तर इक्बाल अब्दुल्लाह ९ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, सौराष्ट्राने कालच्या ८ बाद १९२ धावांवरून खेळाला सुरुवात केली. प्रेरक मंकड कालच्या ५५ धावांत ६६पर्यंत भर घालून तंबूत परतला. धवल कुलकर्णीने सूर्यकुमार यादव याच्याकरवी झेलबाद करून डावातील पाचवा बळी मिळविला. तर, जयदेव उनादकट याने २६ चेंडूंत ३१ धावा फटकावून संघाचा धावफलक २३५ पर्यंत नेला. शार्दूल ठाकूरने जयदेवला अखिल हेरवाडकरे झेल देण्यास भाग पाडून सौराष्ट्रचा डाव संपुष्टात आणला. धावफलक सौराष्ट्र पहिला डाव : ९३.२ षटकांत सर्वबाद १९२, अवी बारोत १४, सागर जोगियानी ८, अर्पित वासवदा ७७, शेल्डन जॅक्सन ०, प्रेरक मंकड ६६, जयदेव उनादकट ३१, धवल कुलकर्णी ५/४२, शार्दूल ठाकूर ३/८९, अभिषेक नायर १/४२, बलविंदरसिंग संधू १/४१, मुंबई पहिला डाव : ६६ षटकांत ८ बाद २६२, अखिल हेरवाडकर ०, भाविन ठक्कर ६, श्रेयस अय्यर ११७, सुर्यकुमार यादव ४८, आदित्य तारे १९, सिद्धेश लाड नाबाद २२, इक्बाल अब्दुल्लाह नाबाद ९, जयदेव उनादकट २/५५, हार्दिक राठोड ४४/३, चिराग जानी २/४६, दीपक पुनिया १/९३.