शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

रो'हिट'च्या दमदार खेळीनंतर भारताचे बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान

By admin | Updated: February 24, 2016 20:36 IST

खराब सुरवातीनंतर रोहित शर्मोच्या (८३) धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने १६६ धावापर्यंत मजल मारली व बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. २४ - खराब सुरवातीनंतर रोहित शर्मोच्या (८३) धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने १६६ धावापर्यंत मजल मारली व बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले आहे. रोहित (रो'हिट') शर्माने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने तुफानी ८३ धावा केल्या.  
खराब सुरवातीनंतर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने शेवटच्या हाणामारीच्या षटकात भारताला चांगली धावसंख्या जमवून दिली. पांड्याने १८ चेंडूत झटपट ३१ धावांचे योगदान दिले. त्यात त्याने ४ चौकार आणि एक षटकार लगावला.
आशिया चषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय फलंदाजानी खराब सुरवात केली, सामना सुरु झाल्या नंतर दुसऱ्या षटकात सलामीवीर शिखर धवन वैयक्तिक २ धावावर बाद झाला. सुरेश रैना १३ धावावर बाद झाला. तर संघाच्या २२ धावा असताना धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला मशरफी मुर्तजाने ८ धावावर बाद केले. कर्णधार धोणीने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत २ चेंडूत नाबाद ८ धावा केल्या 
रोहित शर्माने युवराजच्या सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण मोठा फटका मारण्याच्या नादात युवराज १५ धावावर बाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. शेवटची षटके असल्यामुले धोणी आपल्या आधी हार्धिक पांड्याला बडती दिली. पांड्याने फटकेबाजी करताना १८ चेंडूत ३१ धावा केल्या 
आशिया चषकाच्या सलामीच्या लढतीत बांगलादेशनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी फिट झाला असून, आजच्या सामन्यात तो सहभागी होणार आहे. मिरपूरच्या शेरे बांगला स्टेडियमवर हा सामना रंगला आहे . भारतात होणाऱ्या आगामी  विश्व टी-२० स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा वन-डे ऐवजी टी-२० फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहेत .
 
प्रतिस्पर्धी संघ
भारत :-
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, आर. आश्विन, जसप्रीत बुमराह
बांगलादेशचा संघ : 
इमरुल कैस, सौम्या सरकार, सब्बीर रेहमान, महमदुल्ला, शकीब अल हसन, मुशफिकूर रहीम (यष्टिरक्षक), मशरफी मोर्तझा (कर्णधार), महंमद मिथून, अल अमीन होसेन, मुस्तफिझूर रेहमान, टस्किन अहमद.