शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

‘आफ्रिदीच्या खराब नेतृत्वामुळे हरलो’

By admin | Updated: April 1, 2016 03:55 IST

पाकिस्तान संघाचे कोच वकार युनूस यांनी पाकिस्तान संघाच्या टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीचे खापर कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या डोक्यावर फोडले आहे. शाहिद फलंदाजी

कराची : पाकिस्तान संघाचे कोच वकार युनूस यांनी पाकिस्तान संघाच्या टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीचे खापर कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या डोक्यावर फोडले आहे. शाहिद फलंदाजी आणि गोलंदाजीत लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही, असे वकारने पीसीबीला दिलेल्या सहा पानी अहवालात लिहिले आहे. आशिया चषक तसेच टी-२० विश्वचषकात शाहिद स्वत:च्या उत्तरदायित्वाबद्दल गंभीर नव्हता असा आरोप करीत वकार म्हणाला, ‘शाहिद हा फलंदाजी- गोलंदाजीसह नेतृत्वाला देखील न्याय देण्यात अपयशी ठरल्याची चर्चा मी अनेकदा केली, पण माझे म्हणणे कुणी लक्षात घेतले नाही. सराव सत्र आणि संघाच्या बैठकांना देखील तो दांडी मारायचा. त्याच्या खराब कामगिरीमुळे आम्हाला सामने गमवावे लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. कर्णधार म्हणून आफ्रिदीला काय हवे हे देखील न कळण्यासारखे चित्र होते. पाक सुपर लीगदरम्यान खेळाडूंचा कुठालही सराव झाला नाही शिवाय आशिया चषकात संघ थकलेला आणि अनफिट वाटत होता. जो कर्णधार सराव आणि बैठकीत सहभागी होऊ शकत नाही तो संघाचे नेतृत्व कसे काय करू शकेल, असा सवाल वकारने उपस्थित केला. वकार पहिल्यांदा २०११ मध्ये संघाचा कोच बनल्यापासून आफ्रिदीसोबत फाटण्याची ही पहिलीच वेळ आहे. वकार व आफ्रिदीच्या भांडणानंतर आफ्रिदीकडून नेतृत्व काढून घेण्यात आले होते. वकार युनूस आफ्रिदीवर भडकलावकार म्हणाला, ‘आफ्रिदीने डावपेच अंमलात आणले नाहीत शिवाय योग्य खेळाडूला योग्य स्थानावर संधी दिली नाही. फलंदाजीचा क्रम आणि फिल्डिंग बदलल्याने मोठे नुकसान झाले. कर्णधार दडपणात असल्याने संघाचे मनोबल ढासळले होते. मी खेळाडूंना कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी मैदानात कर्णधारच खेळाडूंचे नेतृत्व करीत असल्याने डावपेच अंमलात आणू शकतो.’वकार यांच्यानुसार मोहम्मद हाफिज याने गुडघ्याच्या दुखापतीची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली नव्हती. या दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध बाहेर बसावे लागले. उमर अकमल आणि अहमद शहजाद यांच्या बेशिस्त वर्तनाचा अहवाल देखील वकारने सादर केला. निवड समिती माझे ऐकत नाही. मी सलमान बट्टला खेळविण्याची सूचना केली; पण मुख्य निवडकर्ते हारुण रशिद यांनी मला विश्वासात न घेताच खुर्रम मंजूर याला संघात स्थान दिले. पाक क्रिकेट सुधारायचे झाल्यास साहसी निर्णयाची गरज असल्याचे सांगून वकार म्हणाला, मीडियाच्या दडपणात काम करण्याची गरज नाही.उमर अकमलसारख्यांवर कारवाई झाल्यास पाकला गौरव मिळवून देतील, असे खेळाडू पुढे येऊ शकतात. कोचला निवड समितीत सहभागी करून घेण्याची सूचना वकारने केली. (वृत्तसंस्था)