शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

द. आफ्रिका मुसंडी मारणार?

By admin | Updated: November 22, 2015 04:09 IST

मोहालीतील पहिली कसोटी जिंकल्यानंतर बंगलोरचा दुसरा सामना पावसात वाहून गेल्याने चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाने प्रतिस्पर्धी द.आफ्रिकेकडून

तिसरी कसोटी : नागपुरात टीम इंडियाला सावध राहण्याची गरजनागपूर : मोहालीतील पहिली कसोटी जिंकल्यानंतर बंगलोरचा दुसरा सामना पावसात वाहून गेल्याने चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेल्या टीम इंडियाने प्रतिस्पर्धी द.आफ्रिकेकडून सावध राहण्याची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघ विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर कधीही मुसंडी मारू शकतो.भारताने जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीवर २००८ ते २०१२ ला चार वर्षांत चार कसोटी सामने खेळले. त्यातील दोन जिंकले; एक सामना अनिर्णीत राहिला, तर एक सामना गमवावा लागला होता. भारताला या मैदानावर द. आफ्रिकेकडून फेब्रुवारी २०१० मध्ये पराभूत व्हावे लागले. त्यावेळी भारतीय संघ एक डाव सहा धावांनी हरला होता. या मैदानावर भारताने नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला १७२ धावांनी आणि नोव्हेंबर २०१० मध्ये न्यूझीलंडला एक डाव १९८ धावांनी नमविले. डिसेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णीत राहिली. द. आफ्रिका संघ यंदा भारत दौऱ्यात टी-२० आणि वन डे मालिकेत विजयी ठरल्यानंतर कसोटीत मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीत संघर्ष करीत आहे, पण २०१० मध्ये जामठा स्टेडियमवर मिळालेल्या विजयातून कर्णधार हशीम आमलासह संपूर्ण संघ विजयाची प्रेरणा घेऊ शकतो. २०१० च्या मालिकेत ग्रॅमी स्मिथ आफ्रिकेचा कर्णधार होता. आफ्रिकेने अमलाच्या २५३ आणि जॅक कालिसच्या १७३ धावांच्या बळावर ६ बाद ५५८ धावा उभारून डाव घोषित केला. भारताचा पहिला डावा वीरेंद्र सेहवागच्या १०९ धावानंतरही २३३ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात सचिनच्या १०० धावानंतरही भारत ३१९ पर्यंतच मर्यादित राहिल्याने सामना हातून निसटला. वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने दोन्ही डावांत एकूण १० गडी बाद केले होते.सध्याच्या संघातील सलामीवीर मुरली विजय, यष्टिरक्षक रिद्धिमान साहा, लेग स्पिनर अमित मिश्रा, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हे २०१० च्या भारतीय संघात होते. विजयने दोन्ही डावांत ४ आणि ३२, साहाने ० आणि ३६ धावा केल्या. मिश्राने ५३ आणि १४० धावा मोजल्या; पण एकही गडी बाद करता आला नव्हता. ईशांतने २८ षटकांत ८५ धावा मोजल्या खऱ्या, पण त्यालाही गडी बाद करता आला नाही. (प्रतिनिधी)दक्षिण आफ्रिका संघ नागपुरातमहात्मा गांधी-नेल्सन मंडेला कसोटी मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या हाशिम आमलाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी शनिवारी नागपुरात दाखल झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान २५ नोव्हेंबरपासून व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे कडक सुरक्षा व्यवस्थेत शनिवारी दुपारी ४.४०च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू हॉटेल प्राईडमध्ये पोहोचले. हॉटेलच्या परिसरात युवा चाहत्यांनी खेळाडूंच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम अमला यांची झलक बघितल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या नावाच्या घोषणा करीत त्यांचे स्वागत केले. दक्षिण आफ्रिका संघाला मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बंगलोरमध्ये खेळल्या गेलेली दुसरी कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत संपली. दक्षिण आफ्रिका संघाच्या व्हीसीए जामठा स्टेडियमबाबत संस्मरणीय आठवणी आहेत. २००९-२०१० मध्ये हाशिम अलमाने (२५३) येथे द्विशतकी खेळी केली होती, तर वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पहिल्या डावात ५१ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेतले होते. त्या लढतीत स्टेनने १० बळी घेतले होते.