ऑनलाइन लोकमत
ड्यूनेडिन, दि. २५ - वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. स्कॉटलंडचे २११ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने ४९.२ षटकांत ९ गडी गमावून गाठले.
वर्ल्डकपमध्ये गुरुवारी स्कॉटलंड व अफगाणिस्तान हे संघ सामने होते. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या अचूक मा-याने स्कॉटलंडला ५० षटकांत सर्वगडी गमावत २१० धावाच केल्या. स्कॉटलंडने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी अफगाणिस्तानची अवस्था बिकट होती. अफगाणची अवस्था ७ बाद ९८ अशी झाली होती. मात्र सॅमिउल्लाह शेनवारीने तळाच्या फलंदाजाच्या मदतीने अफगाणिस्तानला विजयाच्या समीप नेले. शेनवारी ९६ धावांवर बाद झाला. यानंतर हमीद हसन आणि शपूर झरदान यांच्या अनुक्रमे १५ आणि १२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. झरदानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. वर्ल्डकपमध्ये अफगाणचा हा पहिला विजय आहे.