शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

'या' अभिनेत्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत केले होते देशाचे प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 17:56 IST

राष्ट्रकुल स्पर्धेबाबतच्या अनेक रंजक गोष्टींची सध्या चर्चा आहे.

मुंबई: ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरू असणाऱ्या Commonwealth Games 2018 (राष्ट्रकुल स्पर्धा) भारतीय खेळाडू चांगलेच यश मिळवत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रकुल स्पर्धेबाबतच्या अनेक रंजक गोष्टींची सध्या चर्चा आहे. यापैकी हॉलिवूड अभिनेता जेसन स्टेथमचा किस्सा सध्या भलताच गाजत आहे. हॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून कारकीर्दीला सुरूवात करण्यापूर्वी जेसन स्टेथम याने ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. जेसन हा व्यावसायिक जलतरणपटू (डायव्हर) होता. त्याने 1990 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधित्त्व केले होते. ब्रिटनच्या राष्ट्रीय संघात असलेल्या जेसनने डायव्हिंगच्या तीन विविध प्रकारांमध्ये भाग घेतला होता. मात्र, यावेळी त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. 

काही वर्षांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत त्याने याबद्दल माहिती दिली होती तेव्हा अनेकजण अवाक झाले होते. जेसनने सांगितले होते की, मला लहानपणापासून खेळांची प्रचंड आवड होती. मी तेव्हा कुंग फू, किक बॉक्सिंग, कराटे, फुटबॉल आणि डायव्हिंग असे अनेक खेळ खेळायचो, असे जेसनने सांगितले होते. अवघ्या 12 वर्षांचा असताना ब्रिटनच्या राष्ट्रीय जलतरण संघात त्याची निवड झाली होती. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेतील निराशादायक कामगिरीनंतर जेसन स्टेथमने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला होता. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Sportsक्रीडा