ऑनलाइन लोकमतरिओ, दि. 8- ऑलिम्पिकच्या 2016च्या चौथ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी आशादायक ठरली आहे. भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रानं भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत अभिनव बिंद्रा 625.7 गुणांची कमाई 7व्या स्थानी झेप घेतली आहे. तर 621.7 गुण मिळवलेला गगन नारंग स्पर्धेबाहेर गेला असून, तो 23व्या स्थानावर फेकला गेला आहे. अभिनव बिंद्रानं 6 फेरीत 625.7 गुणांची कमाई केली आहे. प्रत्येक फेरीत 10 शॉट लावणे गरजेचं असं. अभिनवनं पहिल्या फेरीमध्ये 104.3 अशी गुणांची कमाई केली होती. त्यानंतर दुस-या फेरीमध्ये त्यानं चांगली खेळी करत 104.4 असे गुण मिळवले होते. तिस-या फेरीत अभिनवनं 105.9 असे सर्वाधिक गुण मिळवले. मात्र त्यानंतरच्या दोन फे-यांमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. अभिनवनं चौथ्या आणि पाचव्या फेरीत प्रत्येकी 103.8 आणि 102.1 असे गुण मिळवले. अखेरच्या फेरीत बिंद्रानं उत्कृष्ट खेळाच्या जोरावर 105.2 गुणांपर्यंत मजल मारली आणि तो सातव्या स्थानी राहून अंतिम फेरीत पोहोचला.
अभिनव बिंद्राची अंतिम फेरीत धडक
By admin | Updated: August 8, 2016 19:34 IST