शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अभिजितची साधना फळास आली, ड्रॉ अवघड असतानाही दडपण न बाळगता मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:41 IST

पुणे : हवेली तालुक्यातील कटकेबवाडीच्या अभिजितने महाराष्ट्राच्या लालमातीचा सर्वोत्तम किताब मिळविताना गेली सहा-सात वर्षे केलेली साधना अखेर फळास आली.

पुणे : हवेली तालुक्यातील कटकेबवाडीच्या अभिजितने महाराष्ट्राच्या लालमातीचा सर्वोत्तम किताब मिळविताना गेली सहा-सात वर्षे केलेली साधना अखेर फळास आली.६१ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात अभिजित सहभागी झाला तो गदा मिळविण्याच्या भक्कम इराद्याने. सोडत अवघड असताना देखील अभिजितच्या चेहºयावर तसुभर दडपण आले नव्हते. पहिल्याच फेरीत पुणे जिल्ह्याचा महाबली शिवराज राक्षेचे आव्हान ७-२ गुणांनी आघाडी घेत सहजतेने परतवून लावले होते. शिवराजवर केलेली आक्रमणे अतिशय वाखणण्याजोगी होती. पहिल्यांच फेरीतून मी किताबाचा प्रबळ दोवदार आहे याची चुणूक त्याने दाखविली.दुसºया फेरीत आंतरराष्ट्रीय खेळाडू गणेश जगताप याच्याबरोबर झालेली लढत अतिशय शांत डोक्याने खेळत अभिजितने गुणांवर मात केली. थंड डोक्याने केलेले डावपेच अभिजितला विजयी करण्यास सहायभूत ठरले. मोक्याच्या वेळी अभिजितने केलेला बचाव एखाद्या मुत्सद्दी कुस्तीगीरासारखा होता.उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या महेश वरुटेबरोबरची लढत अभिजितच्या दृष्टीने फारशी आव्हानात्मक नव्हती. महेश वरुटेवर एका पाठोपाठ एक गुणांची कमाई करत लढत १० गुणांच्या फरकाने अभिजितने एकतर्फी जिंकत गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.या अंतिम फेरीच्या लढतीत अक्षय शिंदेचे आव्हान खडतर असेल असे अनेक कुस्ती शौकिनांचे मत होते. कारण वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीत अभिजित विरुद्ध अक्षयची लढत काटेकी टक्कर अशी झाली होती. परंतु या लढतीतील चुका ध्यानात घेऊन अभिजितने अक्षयला कोणतीही संधी न देता सलग गुणांची बरसात करत एका पाठोपाठ एक १० गुण मिळवून उपस्थित कुस्ती शौकिनांचे अंदाज चुकीचे ठरवत एकतर्फी विजय मिळवून महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीत धडक मारली.खºया अर्थाने अभिजितची कसोटी होती ती अनुभवी किरण भगतच्या प्रबळ आव्हानासाठी. सहा मिनिटाच्या कुस्तीपैकी पाच मिनिटे १२ सेकंद कुस्ती झाली असताना ४-७ गुणांनी पिछाडीवर असलेल्या अभिजितने शेवटच्या ४० सेकंदात दिलेली लढत आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून न हलणारी आहे. एवढेच नाहीतर अभिजितचे मार्गदर्शक अमर निंबाळकर यांनी दाखविलेली खेळाडू वृत्ती आणि अभिजितला दिलेले प्रोत्साहन या कुस्तीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. ८-७ गुणांचा गुणफलक आणि २० सेकंद बाकी, समोर अनुभवी किरणसारखा मल्ल हुकमी डाव टाकण्याच्या इराद्यात आणि अशा वेळी न गडबडता अभिजितने केलेला बचाव आणि त्यातून संपादन केलेले गुण फारच दुर्मिळतेने पाहण्यास मिळतात.एकंदरीत अभिजितचा विजय म्हणजे अखंड साधनेतून केलेली मेहनत, आक्रमक लढाऊ वृत्ती आणि भक्कम बचाव या त्रिसूत्रीमुळे मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.महाराष्ट्र केसरीच्या या रंगतदार लढतीबरोबर अनेक उमद्या खेळाडूंनी देखील प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. पहिल्यांदाच वरिष्ठ विभागात पदार्पण केलेला पुणे जिल्ह्याचा आदर्श गुंड याने मिळविलेला विजय खूपच कौतुकास्पद होता. कांस्यपदकाला गवसणी घालताना आदर्शने अनेक अनुभवी मल्लांना लीलया हरवले. तसेच पुणे शहराच्या तेजस वांजळेने मिळविलेले सुवर्ण पदकदेखील वाखणण्याजोगे ठरले. माती विभागात इंदापूरच्या सागर मारकडचे सुवर्णपदक काही कमी मोलाचे नव्हते. थोडक्यात पुणे जिल्ह्यातील या नवोदित मल्लांचे यश देखील तोलामोलाचे आहे.