रिओ- सरकार पुरस्कृत डोपिंगचा आरोप असलेल्या रशियन खेळाडूंसाठी गुरुवारची संध्याकाळ अत्यानंदाची ठरली. स्पर्धा सुरू होण्यास २४ तासांपेक्षाही कमी अवधी शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने रशियाच्या ७८ खेळाडूंना आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संमती दिल्याचे जाहीर केले. यात २९ जलतरणपटू, १८ नेमबाज प्रत्येकी ११ मुष्टियोद्धे व ज्युदो खेळाडू, ८ टेनिसपटू व एका गोल्फ खेळाडूचा समावेश आहे.
रशियाच्या ७८ खेळाडूंना ‘ग्रीन सिग्नल’
By admin | Updated: August 5, 2016 04:07 IST