नवी दिल्ली : टोकियो वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपममध्ये एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. जिथे 64 वर्षीय आईने आपल्या 33 वर्षीय मुलासाठी मैदानात उतरून इस्रायलचा पराभव केला आहे. दरम्यान, जेव्हा आपल्या मुलाला कोर्टासाठी जोडीदार मिळत नव्हता तेव्हा खेळाडू मिसाची आई स्वेतलाना स्वतः मैदानात उतरली. माय-लेकाने मिळून मिश्र दुहेरीचा सामना खेळला. आई-मुलाच्या जोडीने इजिप्तच्या हातम अल्गामल आणि दोहा संघाचा 2-1 ने पराभव केला. पहिला सामना जिंकल्यानंतर आई आणि मुलाच्या या जोडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
2009 मध्ये मिसाने बॅडमिंटनमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याची आई स्वेतलाना यांचे वय 51 होते आणि तो स्वत: अवघ्या 20 वर्षांचा होता. याच माय-लेकाच्या जोडीने हैदराबादमध्ये पार पडलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये धुमाकूळ घातला होता. लक्षणीय बाब म्हणजे मिसाच्या आईने युरोपियन चॅम्पियनशिप 1986 मध्ये कांस्य पदक जिंकले होते.
मुलासोबत ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्नस्वेतलाना यांचे आपला मुलगा मिसासोबत ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न आहे. आगामी खेळांमध्ये आपण आणखी चांगली कामगिरी करू आणि ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले, इस्रायलमध्ये फारसे बॅडमिंटनपटू नाहीत. इस्रायलमध्ये एकही बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र नाही. जेव्हा सराव करावा लागतो तेव्हा लोक महिन्यातून एक दिवस जमतात आणि 3-4 तास सराव करतात. तसेच आम्ही चीन आणि दक्षिण कोरियासारख्या संघांना पराभूत करण्यासाठी खेळत आहोत. आम्ही खेळताना निकालाचा विचार करत नाही, तर आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. असे स्वेतलाना यांनी अधिक सांगितले.