शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाच भारतीय बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत, ज्योती, शशी, अंकुशिता, नीतू , साक्षी यांचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 03:42 IST

गुवाहाटी : ज्योती गुलिया, शशी चोप्रा, अंकिता बोरो, नीतू घनघास आणि साक्षी चौधरी या भारतीय खेळाडूंनी एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या तिस-या दिवशी मंगळवारी दमदार विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीकडे कूच केली.

गुवाहाटी : ज्योती गुलिया, शशी चोप्रा, अंकिता बोरो, नीतू घनघास आणि साक्षी चौधरी या भारतीय खेळाडूंनी एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या तिस-या दिवशी मंगळवारी दमदार विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीकडे कूच केली. लाईटवेट गटात नीतू घनघास हिनेदेखील पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना बल्गेरियाची टोडोरोवा इमी मारी हिचा ४-१ ने पराभव केला. सत्रातील अखेरच्या उपउपांत्यपूर्व लढतीत ४५ किलो बँटमवेट गटात साक्षी चौधरीने ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित रशियाची शदाबेवा इंदिरा हिला नमविले.हरियानाची ज्योती आणि स्थानिक आकर्र्षण असलेली अंकुशिता यांनी चाहत्यांच्या उत्साहात कौशल्य पणाला लावून आपापल्या बलाढ्य प्रतिस्पर्धी बॉक्सरला नमविले. शशी सुरुवातीला सावध खेळली. प्रतिस्पर्धी लीन ली वेईची ताकद आणि कमकुवतपणा लक्षात येताच सातत्यपूर्ण ठोशांच्या बळावर शशीने पुढील दोन्ही फेºयांमध्ये वर्चस्व गाजवून लढत एकतर्फी ठरविली. सरळ ठोसे मारण्यात पटाईत असलेल्या शशीने लीच्या थेट जबड्यावर प्रहार करीत चाहत्यांची वाहवा मिळविली.अंकुशिताने खास शैलीत विजय साजरा केला. तुर्कस्तानची अलुक कॅगेला हिच्याशी तिची गाठ होती. गुवाहाटीची शान असलेल्या अंकुशिताला कॅगेलावर विजय नोंदविण्याची खुमखुमी होतीच. इस्तंबूल येथे मागच्या महिन्यात झालेल्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत कॅगेलाने अंकुशितावर विजय नोंदविलाहोता. आज अंकुशिताने घरच्या रिंगणात कॅगेलावर विजय नोंदवित पराभवाचेउट्टे काढले.भारतीय संघाचे हायपरफॉर्मन्स संचालक आणि मुख्य कोच राफेल बर्गामास्को यांनी इस्तंबूलमध्ये सेटबॅक मिळाल्यामुळे या लढतीसाठी डावपेच बदलले होते. सुरुवातीपासून कॅगेलावर तुटून पडायचे आणि तिला संधीच द्यायची नाही, असे हे डावपेच होते. त्यात अंकुशिता यशस्वी ठरली.‘कॅगेलाने मला स्वत:च्या देशात नमविले. मी या पराभवाची परतफेड करण्याच्या भावनेतून खेळले. माझ्या देशात मी तिला नमवू शकले,’ याचा आंनद वाटत असल्याची प्रतिक्रिया अंकुशिताने विजयानंतर दिली.नीतू विजयाबद्दल खूष होती. ती म्हणाली, ‘ही लढत माझ्यासाठी सोपी होती. मी याआधीही टोडोरोवाला बल्गेरियात पराभूत केले होते. त्यामुळे तिला कसे तोंड द्यायचे, याची जाणीव होती. पहिल्या फेरीत तिने मला मोकळे खेळण्याची संधी दिली नाही, मग कोचने मला पवित्रा बदलण्याची सूचना केली. पुढील दोन फेºयांमध्ये याचा लाभ झाला.’>भारतीय खेळाडूंचे निकालतिसरा दिवस : लाईट फ्लायवेट (४५ ते ४८ किलो) : नीतू घनघास भारत वि. वि. टोडोरोवा इमी मारी बल्गेरिया ४-१,फ्लायवेट ५१ किलो : ज्योती गुलिया भारत वि. वि. लिसिन्स्का अनास्तासिया युक्रेन ५-०, बँटमवेट ५४ किलो : साक्षी चौधरी वि. वि. शदाबेवा इंदिरा रशिया ३-२, फिदरवेट ५७ किलो : शशी चोप्रा भारत वि. वि. लीन ली वेई चायनीज तैपेई ५-०, लाईट वेल्टरवेट ६४ किलो : अंकुशिता बोरो भारत वि. वि. अलुक कॅगेला तुर्कस्तान ५-०.

टॅग्स :boxingबॉक्सिंग