शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

BCCI देणार महिला क्रिकेट टीमच्या प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचं बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:54 IST

भारतीय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूंला बीसीसीआय प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस देणार आहे

ऑनलाइन लोकमत

 
मुंबई, दि. 22-  भारतीय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूंला बीसीसीआय प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस देणार आहे.तर सपोर्टिंग स्टाफला 25 लाखांचं बक्षीस बीसीसीआयने जाहीर केलं आहे. बीसीसीआयकडून शनिवारी या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी महिला विश्वचषकातील कामगिरीबद्दल बीसीसीआयने महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. 
 
शुक्रवारी बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सी.के खन्ना यांनी बीसीसीआय महिला खेळाडूंना योग्य बक्षीस देणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसारच बीसीसीआयने शनिवारी बक्षीसाची घोषणा केली आहे.  आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला होता.
 
बीसीसीआय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना योग्य बक्षीस देणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये टीम इंडियाची खेळी उत्तम होते आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. विशेष म्हणजे सगळ्यांनाच अभिमान वाटेल अशी खेळी हरमनप्रीत कौर या खेळाडूने केली आहे, असं सीके खन्ना म्हणाले होते. 
 
विश्वचषकाची अंतिम फेरी गाठल्याबद्दल बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिंनदन केले. बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी हरमनप्रीतच्या खेळीचे कौतुक करीत कर्णधार मिताली आणि संघाला फायनल जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. चर्चा केल्यानंतर विश्वचषकातील शानदार कामगिरीसाठी महिला संघाला रोख पुरस्कार घोषित करू, असं खन्ना म्हणालं होते.
 
सेमी फायनलमध्ये रन्सचा तडाखा
 
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत मोक्याच्या वेळी झुंजार अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवत दीप्ती शर्माने घेतलेल्या बहुमूल्य बळीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अष्टपैलू हरमनप्रीत कौरने झळकावलेल्या तुफानी दीड शतकानंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या भारताने गतविजेत्या बलाढ्य ऑस्टे्रलियाला ३६ धावांनी नमवलं. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४२ षटकांत ४ बाद २८१ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ४०.१ षटकांत २४५ धावांवर थोपवलं.  हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाची जबरदस्त धुलाई करताना ११५ चेंडूत २० चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद १७१ धावांची तुफानी खेळी केली. भारताने निर्धारीत ४२ षटकात ४ बाद २८१ धावा केल्या.
 
पावसाच्या व्यत्ययानंतर उशीराने सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम नाणेफेकीचा निर्णय घेतला. स्मृती मंधना (६) आणि पूनम राऊत (१४) हे सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार मिताली राज (३६) व हरमनप्रीत यांनी डाव सावरला. हरमनप्रीतने यावेळी भारताकडून दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावांची वैयक्तिक खेळी केली. दीप्ती शर्माने याचवर्षी मे महिन्यात आयर्लंडविरुध्द १८८ धावा फटकावल्या होत्या. भारताची अडखळती सुरुवात झाल्यानंतर मिताली - हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. मात्र, मिताली २५व्या षटकात बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने सगळी सुत्रे आपल्याकडे घेत दीप्ती शर्मासोबत चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची निर्णायक भागीदारी केली