शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

२०२४चे आॅलिम्पिक भारतात शक्य!

By admin | Updated: April 7, 2015 04:02 IST

जगातील सर्वांत मोठा क्रीडा कुंभमेळा असलेले आॅलिम्पिक आपल्या देशात होण्याचे सव्वाशे कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे

पुणे : जगातील सर्वांत मोठा क्रीडा कुंभमेळा असलेले आॅलिम्पिक आपल्या देशात होण्याचे सव्वाशे कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. २०२४चे आॅलिम्पिक भारतात होऊ शकते. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅश या महिन्याच्या २७ तारखेला भारतात येणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. त्यावेळी भारतात २०२४च्या आॅलिम्पिक आयोजनासंदर्भात महत्वाची चर्चा अपेक्षित असल्याचे सुत्रांनी सांगितले. बॅश यांच्या भारत दौऱ्यासंदर्भात भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष रामचंद्रन यांनी कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवले आहे. रामचंद्रन आणि भारताचे क्रीडा सचिव यांनी लुसान येथे बॅश यांनी भेट घेऊन त्यांनी भेट निश्चित केली. या दौऱ्यात ते भारतातील खेळांचा विकास आणि इतर बाबींवर चर्चा करणार आहेत. लुसाने भेटीत बॅश यांना आॅलिम्पिकमधील क्रीडा प्रकारांसाठी निधी देण्याबाबतही विनंती करण्यात आली. आयओएचे महाराष्ट्रातील एकमेव सदस्य नामदेव शिरगावकर यांनी अध्यक्षांकडून असे पत्र पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. २०१६चे आॅलिम्पिक रिओमध्ये, तर २०२०ची स्पर्धा टोकियोत होणार आहे. २०२४च्या स्पर्धेसाठी रोम, हॅम्बर्ग, बोस्टन या शहरांनी आधीच रस दाखवलेला आहे. भारतासह नैरोबी, दोहा, पॅरिस आणि सेंट पीर्ट्सबर्ग ही शहरेदेखील या शर्यतीत सामील होण्याची शक्यता आहे. आॅलिम्पिक बीडसाठी अधिकृतरित्या ५४० कोटी रुपये खर्च येतो. मात्र. लॉबिंग आणि ‘इतर’ गोष्टींचा विचार करता हा खर्च १००० ते १२०० कोटीच्या घरात जातो. भारताची आर्थिक प्रगती पाहता हा देश येत्या काळात आॅलिम्पिकचे यशस्वीपणे आयोजन करू शकतो, असा विश्वास क्रीडाविश्वातील अनेक तज्ज्ञांना वाटते.भारताने आॅलिम्पिसाठी बिडिंग करण्याचे निश्चित झाल्यावर सहाजिकच राजधानी दिल्लीला यजमानपदाचे शहर म्हणून प्राधान्य असेल. मात्र, तेथे रोर्इंग आणि यॉटिंग यांसारख्या खेळांसाठी आवश्यक मोठा तलाव वा समुद्र परिसरात नाही. हे पाहता दिल्लीनंतर पुण्याला अशी संधी लाभू शकते. किंवा पुण्यासह मुंबईला संयुक्त यजमानपदाचे दावेदार ठरवले जाऊ शकते. या ठिकाणी इतर खेळांबरोबरच रोर्इंग आणि यॉटिंगसाठी मोठे तलाव वा समुद्र दिल्लीच्या तुलनेत कमी अंतरावर उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)