शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

२०१५ मध्ये ‘उम्मीद पे दुनिया कायम !’

By admin | Updated: February 14, 2015 11:07 IST

आपले जेतेपद कायम राखण्यासाठी भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे.... पण, भारताचा सध्याचा फॉर्म आणि झालेली परवड पाहता ते सहज शक्य होईलच असे नाही.

आपले जेतेपद कायम राखण्यासाठी भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे.... पण, भारताचा सध्याचा फॉर्म आणि झालेली परवड पाहता ते सहज शक्य होईलच असे नाही... चाहत्यांनी तर विश्वचषक स्पर्धेपूर्वीच भारताचा पराभव गृहीत धरला आहे.... तसे झाल्यास त्यांना आश्चर्यही वाटणार नाही... उलट भारताने या परिस्थितीवर मात करून बाजी मारल्याचेच आश्चर्य वाटेल... २०११ च्या विश्वचषकाचा विचार केल्यास भारताला त्या खेळपट्टींची माहिती होती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील खेळपट्ट्या या २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या परस्पर विरुद्ध आहेत. आपण भारतीय असल्याने आशावाद हा आपल्याकडे आलाच आणि तोच आशावाद भारत विश्वचषक जिंकेल, असेही सांगत आहे. स्पर्धा संपेपर्यंत आपल्याला ‘उम्मीद पे दुनिया कायम’, असेच मानून चालायला हवे. खेळाडूंचा फॉर्म आणि गोलंदाजांची वणवण या समस्या ‘जैसे थे’च आहेत. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या वन-डे मालिकेत भारताला सपाटून मार खावा लागला होता. नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत भारताला अंतिम फेरीही गाठता आली नव्हती, तर शेवटच्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताला पाचपैकी एकही वन-डे लढत जिंकता आली नव्हती. त्यामुळे आकड्यांवर नजर टाकल्यास भारताची बाजू पडती वाटत असली तरी मजबूत फलंदाजांची फौज ही संघासाठी जमेची बाब आहे. सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांची कामगिरी चढ-उताराची आहे. या फलंदाजांची बॅट तळपल्यास प्रतिस्पर्धी संघाच्या चिंधड्या उडाल्याच समजा. मधल्या फळीत विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू हे भक्कम पर्याय आहेत. स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन हे फलंदाजीतही योगदान देऊ शकतात. कागदावर पाहिल्यास भारताची फलंदाजी जगातील सर्वोत्तम दिसत आहे; परंतु हे केवळ कागदी वाघ ठरू नये ही अपेक्षा. गोलंदाजी ही भारतासाठी सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. सध्याच्या संघात एकही असा गोलंदाज नाही, की जो येथील खेळपट्टींवर प्रभावी मारा करू शकतो. अनुभवाची कमतरता हा मोठा फॅक्टर त्यांच्या अपयशाचे कारण ठरू शकतो. त्यात सर्वाधिक अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे माघारी परतल्याने सर्व मदार नवोदितांवर आली आहे. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहित शर्मा हे गोलंदाज काय छाप सोडतील हे येणारा काळच सांगेल. आणखी एक समस्या आणि ती म्हणजे भारतीय संघ गेल्या वर्षभरात आराम न करता क्रिकेट खेळत आहेत. त्यांना विश्रांती घेण्यासाठी वेळच मिळालेला नाही. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय संघ आॅस्ट्रेलियात तळ ठोकून आहे आणि येथील परिस्थितीशी त्यांनी स्वत:ला चांगलेच जुळवून घेतले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत टीकेचा धनी ठरलेला हाच भारतीय संघ कुणास ठाऊक जेतेपदाची माळ पुन्हा एकदा गळ्यात टाकून मिरवेल?> टीम इंडियाची निळी जर्सी ही सव्वाशे कोटी भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ही जर्सी अंगात घालून भारताचे प्रतिनिधीत्व करावे, असे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाचे लहानपणापासूनचे स्वप्न असते.> टीम इंडियाची जर्सी डिझाईन करण्याचे काम सध्या नाईके ही कंपनी करीत आहे. २0१५ च्या विश्वचषकात टीम इंडिया नव्या जर्सीसह उतरणार आहे. याचा वापर त्यांनी तिरंगी मालिकेतून केला आहे. > ही नवी जर्सी अतिशय कम्फर्ट फिट आहे. यांच्या फोर वे स्ट्रेच ड्राय-फिट फॅब्रिकमुळे खेळाडूंच्या शरीराचे तापमान मेंटेन करते. याशिवाय या जर्सीचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती इकोफ्रेंडली आहे. ३३ प्लास्टिकच्या बॉटल्स रिसायकल करून एक जर्सी बनविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणालाही हातभार लागला आहे. अशा आहेत भारताच्या लढती१५ फेबु्र. - भारत वि. पाकिस्तान२२ फेबु्र. - भारत वि. द. आफ्रिका२८ फेबु्र. - भारत वि. युएई०६ मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज१० मार्च - भारत विरुद्ध आयर्लंड१४ मार्च - भारत विरुद्ध झिम्बाब्वे