शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

२०११ - २८ वर्षांनी भारत पुन्हा जगज्जेता

By admin | Updated: February 15, 2015 16:17 IST

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सोनेरी स्वप्न पूर्ण केले.

विश्वचषकाचे दहावे पर्व भारत, बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये पार पडले. १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या विश्वचषकात संघाची संख्या १४ वर आणण्यात आली. कर्णधार महेंद्रसिंग  धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सोनेरी स्वप्न पूर्ण केले. 
विश्वचषकाच्या दहाव्या पर्वात डीआरएस प्रणालीचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला. याशिवाय अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही आयसीसीने जाहीर केला. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला १० व्या विश्वचषकाचे यजमानपद मिळू शकले नाही. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची विजयी परंपरा भारताने रोखली. ऑस्ट्रेलिया १९९९ नंतर विश्वचषकात एकदाही साखळी सामन्यात पराभूत झाला नव्हता. ऑस्ट्रेलियाचा हा विजयी रथ भारताने रोखला. क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले. गौतम गंभीरच्या ९८ धावा आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद ९१ धावांच्या खेळीने भारताने हे लक्ष्य  ४८. २ षटकांत चार गडी गमावून पार केले आणि २८ वर्षांनी भारत पुन्ह विश्वविजेता झाला. २१ वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने सहा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला; परंतु जेतेपद पटकावता न आल्याची खंत त्याला सतावत होती. २००३ साली जेतेपदाच्या अगदी जवळ जाऊन भारताला परतावे लागले होते. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूने २०११चा विश्वचषक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. अखेरीस सचिनचे हे स्वप्न पूर्ण झाले. 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ४९ 
एकूण धावा - २१, ३३३
एकूण विकेट्स - ७३१
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - तिलकरत्ने दिलशान - श्रीलंका (९ सामन्यात ५०० धावा)
सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज -  शाहिद आफ्रिदी - पाकिस्तान ( ८ सामन्यात २१ विकेट)