शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
5
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
6
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
7
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
8
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
9
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
10
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
11
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
12
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
13
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
14
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
15
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
16
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
17
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
18
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
19
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
20
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर

आॅलिम्पिकसाठी १५ खेळाडू पात्र : हे वर्ष ठरले महत्त्वाचे

By admin | Updated: December 20, 2015 23:50 IST

भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी २०१५ वर्ष संमिश्र यशाचे ठरले. ज्यात १५ खेळाडू रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणे आणि युवा खेळाडू दुती चंदचा जागतिक संघटना आयएएफविरुद्ध ऐतिहासिक विजय हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले.

नवी दिल्ली : भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी २०१५ वर्ष संमिश्र यशाचे ठरले. ज्यात १५ खेळाडू रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणे आणि युवा खेळाडू दुती चंदचा जागतिक संघटना आयएएफविरुद्ध ऐतिहासिक विजय हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले.भारताने अद्यापपर्यंत आॅलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचे खाते उघडले नाही; परंतु आतापर्यंत १५ खेळाडू पात्र ठरल्यामुळे पुढील वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे ट्रॅक अँड फिल्डचे पथक मोठे होण्याची शक्यता आहे.भारताचा दिग्गज थाळीफेकपटू विकास गौडा हा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आयएएफने सहभागींची संख्या निश्चित केल्यानंतर क्वालिफिकेशन स्तर ६६ मीटरवरून ६५ मीटर केला. गौडाने मे महिन्यात जमैका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान ६५.१४ मीटर थाळीफेक करीत आपला सहभाग निश्चित केला होता. बीजिंगमध्ये आॅगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. यात फक्त ललिता बाबर हिने ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. ती आठव्या स्थानी राहिली होती. यादरम्यान तिने ९ मिनीट २७.८६ सेकंद वेळेचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला होता. अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या गौडा याने तिसऱ्यांदा जागतिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली; परंतु ६३.८४ मीटरच्या निराशाजनक कामगिरीने तो नवव्या स्थानी राहिला.चीनच्या वुहान विश्व चॅम्पियनशिपच्या दोन महिन्याआधी झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताची कामगिरी प्रभावी ठरली. भारतीय पथकाने चार सुवर्णपदकांसह एकूण १३ पदके जिंकताना तिसरे स्थान मिळवले. २००७ नंतर ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. या स्पर्धेत भारतासाठी इंद्रजितसिंह, गौडा, ललिता आणि टिंकू लुका यांनी सुवर्णपदक जिंकले. मैदानाबाहेर दुती चंदचे प्रकरण गाजले. दुतीने आयएएफच्या हाइपरएंड्रोगेनिज्म धोरणाविरुद्ध यशस्वीपूर्ण लढा दिला. या धोरणानुसार ज्यांच्यात पुरुष हार्मोनचा (ग्रंथी) स्तर स्वीकृत मर्यादेपेक्षा अधिक आहे अशा महिलांना स्पर्धेसाठी परवानगी दिली जात नाही. अँडोजनचा स्तर अधिक झाल्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ च्या संघात स्थान मिळवू न शकणाऱ्या दुतीने आयएएएफच्या धोरणाविरुद्ध खेल पंचायतमध्ये अपील केले होते. स्वित्झर्लंडस्थित खेल पंचायतचा अंतिम निर्णयानंतर दुतीला जवळपास एका वर्षाच्या ब्रेकनंतर अ‍ॅथलेटिक्समधील तिची कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली. जागतिक संघटनेतही भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांच्या रूपाने भारताला महत्त्वपूर्ण प्रतिनिधित्व मिळाले. आदिल सुमारीवाला यांना जागतिक स्पर्धेआधी झालेल्या निवडणुकीत त्याचा सदस्य म्हणून निवडण्यात आले. माजी आॅलिम्पिक चॅम्पियन सॅबेस्टियन यांची या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून निवड झाली. दरम्यान अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रथमच ब्रिटनचे आॅलिम्पियन डेरेक बुसे यांना हाय परफॉर्मन्स संचालक नेमण्यात आले. त्यांचे लक्ष्य २०२० आॅलिम्पिकपर्यंत भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये कमीत कमी एक पदक मिळवून देणे हे आहे.(वृत्तसंस्था)