ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 13- इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या सत्रात मुंबई इंडियन्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 125 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं निर्धारित 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 124 धावांची आघाडी उभारली आहे.
कॅप्टन शर्माही 1 चौकारासह 15 धावा काढून काही चमक न दाखवता तंबूत परतला आहे. तर राणानं 3 षटकारांसह 25 धावा केल्यात. पोलार्डनंही 3 षटकारांसह 27 धावांची खेळी करून संघाच्या धावसंख्येत भर टाकली आहे. बटलर 9, पंड्या 19, साऊथी 1, मॅक्लेघन 4 धावा काढून तंबूत परतलेत. तर चंड आणि रायुडूला साधा भोपळाही फोडता आला नाही.
पंजाबकडून स्टोनिसनं चमकदार गोलंदाजीच्या जोरावर राणा, बटलर, पंड्या आणि पोलार्ड यांना घरचा रस्ता दाखवला. तर दोन्ही शर्मांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवले आहेत. एकंदरीतच किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सचा वारू 124 धावांवर रोखला आहे.