शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

बुद्धीबळ स्पर्धेत १०९९ विद्यार्थ्यांचा सहभाग; १५० जणांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

By नामदेव मोरे | Updated: October 10, 2023 17:23 IST

मनपाच्या क्रीडा व सांस्कृतीक विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्धीबळ स्पर्धेमध्ये ९६ शाळांमधील १०९९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ७२० विद्यार्थी व ३७९ विद्यार्थीनींचा समावेश होता. तीन वयोगटातील एकूण १५० विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. नवी मुंबईला शालेय क्रीडा स्पर्धांकरिता स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला आहे. यामुळे मनपाच्या क्रीडा व सांस्कृतीक विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढू लागला आहे. 

ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या इनडोअर हॉलमध्ये बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू व मनपाच्या उपायुक्त ललिता बाबर, ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव डॉ. हेमंत अनाथे, सहसचिव प्रविण पैठणकर, मनपाचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव उपस्थित होते. १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुले व मुली विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातून पाच विजेते घोषीत केले असून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड केली आहे. सर्व विजेत्या खेळाडूंचे महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभिनंदन केले आहे.

वयोगटानुसार स्पर्धेचा निकाल१४ वर्ष मुलेविराज राणे- न्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली.गौतम विजयकुमार - युरो स्कुल, ऐरोली.अभिनव व्यंकटेश मिश्रा - डी. वाय.पाटील इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ.ओजस्व कुलकर्णी - फा. ॲग्नल स्कुल, वाशी.हर्षित ललित गुप्ता – डॉन बॉस्को स्कुल, नेरुळ.१४ वर्ष मुलीअवनी वैभव गोवेकर- न्यु होरायझन स्कॉलर स्कुल, ऐरोली.सिध्दी दिवटे- डी.ए.व्ही. पब्लिक स्कुल, ऐरोली.जैना ललित धरमसे - न्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली.सोनाक्षी पंकज महाजन – न्यू बॉम्बे सिटी स्कुल .आर्या विनित पालकर - डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ.१७ वर्ष मुलेमाधव मेनन - पोदार इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ.दिव्यांशु रंजन – दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ.समर्थ पाटकर - न्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली.आयुष काबरा - एव्हॅलॉन हाइटस स्कुल, वाशी.व्दिज जिग्नेशकुमार गोंडालिया - डी.ए.व्ही.पब्लिक स्कुल. नेरुळ.१७ वर्ष मुलीमृगया गोटमारे- फा. ॲग्नल स्कुल, वाशी.अंजु रतन बोगाटी- नमुंमपा शाळा क्र.104, रबाळे.योशिता पाटील- एपीजे स्कुल, नेरुळ.भक्ती विष्णु मांजरेकर – आयईएस नवी मुंबई हायस्कुल, वाशी.समृध्दी पोटरे - एमजीएम स्कुल, नेरुळ.१९ वर्ष मुलेश्रीवेद देशमुख - दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ.श्रेय निकांत अय्यर - साईनाथ हिंदी हायस्कुल.ओजस शितोळे - फा. ॲग्नल स्कुल, वाशी.यश रमेश काशिद – ज्ञानपुष्प विद्यानिकेतन, सी.बी.डी.एकांश नानगिया - दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ.१९ वर्ष मुलीसौख्या गिरीश सावंत- फा. ॲग्नल स्कुल, वाशी.तन्वी शामराव बोराटे - कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी.इशिता सानसवाल - दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ.शर्वरी प्रशांत मोरे- जयपुरीयार स्कुल. सानपाडा.श्रीनिधी पुरुषोत्तम उदडेमरी - दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ. 

टॅग्स :Chessबुद्धीबळNavi Mumbaiनवी मुंबई