शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
4
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
5
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
6
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
7
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
8
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
9
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
10
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
11
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
12
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
13
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
14
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
15
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
16
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
17
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
18
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
19
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!

अँटिग्वा कसोटीनंतर झालेले १० विक्रम

By admin | Updated: July 25, 2016 17:12 IST

विराट कोहली हा दिलीप सरदेसाई, सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि वासिम जाफर यांच्यानंतरचा पाचवा फलंदाज ठरला. यासरखेच या कसोटी सामन्यानंतर अनेक विक्रम झाले. त्यापैकी काही विक्रम आपण जाणून घेऊ...

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २५ : आर अश्विनची अष्टपैलू खेळी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाच्या बळावर भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध धडाकेबाज विजय मिळवला. ४ कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. पहिला कोसोटी सामना भारताने चौथ्या दिवशीच जिंकत विराट विजय मिळवला. या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजला फॉलो ऑन दिला. वेस्ट इंडिजवर घरच्या मैदानात फॉलो ऑनची नामुष्की ओढवण्याची ही आठवी वेळ ठरली. विराट कोहलीचे द्विशतक आणि अश्विनची फिरकी या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. तर कॅरेबियन भूमीत द्विशतक फटकावणारा विराट कोहली हा दिलीप सरदेसाई, सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि वासिम जाफर यांच्यानंतरचा पाचवा फलंदाज ठरला. यासरखेच या कसोटी सामन्यानंतर अनेक विक्रम झाले. त्यापैकी काही विक्रम आपण जाणून घेऊ...- वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या अँटिग्वा कसोटीत विराटने २८३ चेंडूत २०० धावांची खेळी केली. त्याबरोबरच परदेशी भूमीवर द्विशतकी खेळी करणारा विराट भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. तसेच गेल्या दहा वर्षात भारतीय उपखंडाबाहेर द्विशतक फटकावणारा विराट हा पहिला फलंदाज ठरलाय. यापुर्वी, २००६मध्ये वासीम जाफरने वेस्ट इंडिज दौ-यातच द्विशतकी खेळी केली होती. (भारताचा 'विराट' विजय, अश्विनची अष्टपैलू खेळी)

- भारताने एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला. भारताचा भारतीय उपखंडाबाहेरचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी सप्टेंबर २००५ मध्ये भारताने झिम्बाब्वेवर एक डाव आणि ९० धावांनी विजय मिळवला होता.- सामनावीर रविचंद्रन अश्विनने एकाच कसोटीत शतक आणि डावात पाच बळी टिपण्याचा पराक्रम दुसऱ्यांदा केला. याआधी नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत झालेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने अशी कामगिरी केली होती.

   - अश्विनने दुसऱ्या डावात ८३ धावा देत ७ बळी टिपले. त्याची भारताबाहेरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच भारतीय उपखंडाबाहेर त्याने पहिल्यांदाच पाच बळी टिपले.- भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने पहिल्या डावात यष्टीमागे सहा फलंदाजांची शिकार केली. त्याबरोबरच त्याने एका डावात यष्टीमागे सर्वाधिक सहा शिकार करण्याच्या सय्यद किरमानी आणि महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

- भारताविरुद्धच्या गेल्या १६ कसोटीतील वेस्ट इंडिजचा हा नववा पराभव. भारताने २००२ साली केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पाचव्या कसोटीत वेस्ट इंडिजने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यानंतर कसोटी सामन्यात भारताला हरवणे वेस्ट इंडिजला शक्य झालेले नाही.- अनिल कुंबळेने प्रशिक्षक पदाची धुरा संभाळल्यानंतर पहिल्याच कसोटीत भारताचा विजय.- ४९६ कसोटीतील भारताचा १२८ वा विजय, तर वेस्ट इंडिजचा ५१४ कसोटीतील १७८ वा पराभव- भारताचा वेस्ट इंडिज वरील १७वा विजय, तर वेस्ट इंडिजमधील सहावा विजय.- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ११व्या कसोटीतील भारताचा हा सहावा विजय.