शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करांना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
4
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
5
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
6
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
7
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
8
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
9
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
10
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
11
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
12
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
13
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
14
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
15
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
16
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
17
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
18
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
19
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
20
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव

जि.प, पं.स जानेवारीच्या आत

By admin | Updated: September 18, 2014 23:33 IST

ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला

पालघर : ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून  जिल्हापरिषदेच्या 57 निर्वाचीत विभाग (गट) व पंचायत समितीच्या 144 गणांची गटनिश्चिती करण्याचे काम प्राथमिक स्वरूपात पुर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.
ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानतर तेरा पंचायत समित्याचा कार्यकाल बरखास्त करण्यात आल्यानंतर जिल्हापरिषदेसह पंचायत समितीवर सध्या प्रशासकीय कामकाज सुरू आहे. हा प्रशासकीय कार्यकाल सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवता येत नसल्याने विधानसभा निवडणुका पार पडल्या पडल्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील 16 लाख 24 हजार इतकी लोकसंख्या असून पालघर तालुक्यात सर्वाधिक जिल्हापरिषदेचे 17 गट तर पंचायत समितीचे 34 गण तयार करण्यात आले असून सर्वात कमी मोखाडा तालुक्यात जिल्हापरिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण अस्तित्वात येणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या लोकसंख्येच्या आधारे जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गण तयार करण्यात आले असून पालघर तालुक्यात 4 लाख 81 हजार लोकसंख्येनूसार जिल्हापरिषद 17 गट तर पंचायत समिती 34 गणांची निश्चिती संख्या करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात 3 लाख 51 हजार लोकसंख्या असन जि. प. 12 गट तर पं. स. च्या 24 जागा, तलासरी तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 54 हजार असून जिल्हापरिषदेच्या 5 तर पंचायत समितीच्या 1क् जागा, विक्रमगड तालुक्याची 1 लाख 37 हजार लोकसंख्या असून जिल्हापरिषदेसाठी 5 गट तर पंचायत समितीसाठी 1क् गणाच्या जागा, जव्हार तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 28 हजार असून जिल्हापरिषदेच्या 5 गट तर पंचायत समितीचे 1क् गण, वाडा तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 78 हजार इतकी असून जिल्हापरिषदेच्या 6 गट तर पंचायत समितीचे 12 गण, वसई तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 8 हजार इतकी असून जिल्हापरिषदेचे 4 गट तर पंचायत समितीचे 8 गण, तर सर्वात कमी लोकसंख्या व जागा मोखाडय़ाची राहणार असून 83 हजार लोकसंख्या आधारावर जिल्हा परिषदेच्या 3 गट जागा तर पंचायत समितीच्या 6 गणांची जागांची निश्चिती करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. विधानसभा निवडणुका पार पाडल्या नंतर अल्पावधीतच वरील निवडणुका पार पडून 31 जानेवारी 2क्14 च्या आत नवीन जि. प. व पं. स. अस्तित्वात येणार आहेत. (वार्ताहर)
 
निवडणूका नंतर मुहूर्त
विधानसभा निवडणुका पार पडल्या नंतर 31 जानेवारी 2क्14 च्या आत नवीन जि. प. व पं. स. अस्तित्वात येणार आहेत.