शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

यूट्युबर्सची वाशी खाडीपुलावर स्टंटबाजी; पोलिसांकडून शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 02:32 IST

अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावर यूट्युबर्सकडून जीवघेणे स्टंट केले जात असल्याची बाब समोर आली आहे. यावरून वाशी पोलीस व वाहतूक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान त्यांच्या स्टंटबाजी दरम्यान अपघात घडल्यास पुलावर मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मुंबईत ठिकठिकाणी बाईकचे स्टंट करणाऱ्या तरुणांचे मोर्चे वाशी खाडीपुलाकडे वळू लागले आहेत. भरधाव वेगात दुचाकी पळवून दोन्ही हात सोडून पायाने हॅन्डल सांभाळत स्टंट केला जात आहे. यावेळी मोबाइल हाताळून स्टंटबाज आपल्या कलेचे दर्शन घडवत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ नुकताच बनवण्यात आलेला आहे. तर स्टंट केल्यानंतर पकडले जाऊ नये याकरिता दुचाकीला नंबरप्लेट वापरलेली नाही. मात्र दोघांचेही चेहरे स्पष्ट दिसत आहेत. 

व्हिडीओ हाती लागल्यानंतर वाशी पोलिसांनी स्टंटबाजांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याकरिता वाहतूक पोलिसांमार्फत या जोडीचा शोध घेतला जात आहे. ज्या तरुणाच्या नावे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो स्टंटबाज म्हणून यूट्युबवर ओळखला जातो. त्याचे मुंबई परिसरातले असे अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात रहदारीच्या मार्गावर तो स्टंट करत असल्याचे काही व्हिडीओमध्ये दिसते. तर काही व्हिडिओत घोळके जमून वेगवेगळे स्टंट करत असल्याचे दिसते. अशात त्याने नवी मुंबईत येऊन स्टंट करण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा वाशी येथील सागर विहार, जूगाव चौपाटी येथे स्टंट होतात. तेथे मुंबईचे स्टंटबाज येत असतात.

वाशी खाडीपुलावर केले जाणारे स्टंट गंभीर अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. यामुळे नवी मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाईची तयारी चालवली आहे.  त्याकिरता वाहतूक पोलिसांमार्फत स्टंटबाजने प्रवास केलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. - रमेश चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक

टॅग्स :Policeपोलिस