शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

लॉजमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 17, 2023 16:58 IST

अनेक दिवसांपासून तो नैराश्यात होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

नवी मुंबई : घणसोली येथील तरुणाने पावणेतील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आला. अनेक दिवसांपासून तो नैराश्यात होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.

राहुल मछिंद्र कणसे (22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो घणसोली सिम्प्लेक्स येथे राहणारा आहे. बुधवारी त्याने पावणे येथील हायवे टच या लॉजमध्ये रूम घेतली होती. त्याठिकाणी तो एकटाच थांबला होता. रात्री उशिरापर्यंत त्याने रूम न सोडल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवला असता आतून प्रतिसाद मिळत नव्हता.यामुळे त्यांनी पोलिस व अग्निशमन दलाला माहिती दिली असता त्यांनी रूमचा दरवाजा तोडला. यावेळी आतमध्ये बेडशीटने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राहुल हा मागील काही दिवसांपासून तणावात होता असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. याच नैराश्यात त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस