शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे शेंग, सोयाबीन तेल भेसळीचे तर नाही ना! एपीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:26 IST

पाम तेलामध्ये वेगवेगळे रसायन मिसळून ब्रँडेड कंपन्यांच्या नावे शेंगतेल, राईचे तेल तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे.

नवी मुंबई : पाम तेलामध्ये वेगवेगळे रसायन मिसळून ब्रँडेड कंपन्यांच्या नावे शेंगतेल, राईचे तेल तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. एपीएमसीमध्ये मागील काही महिन्यांपासून हा कारखाना चालवला जात होता. त्या ठिकाणच्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.एपीएमसी आवारात गौतम ॲग्रो इंडिया नावाने तेल कारखाना चालवला जात होता. त्याठिकाणी पाम तेलात इतर रसायन मिसळून नामांकित ब्रँडचे शेंगतेल व राईचे तेल बनवले जात होते. याची माहिती अन्न व औषध प्रशासन तसेच गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. 

नमुन्यांचा अहवाल आल्यावर कारवाईएपीएमसी परिसरात तसेच विविध ठिकाणी विक्रीसाठी हे तेल पुरवले जात होते. मात्र, हलक्या दर्जाच्या पाम तेलात रसायन मिसळून बनवलेल्या या तेलामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे छापा टाकून तिथल्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवालानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल.- आबासाहेब पाटील (निरीक्षक, गुन्हे शाखा)

२० कामगार दिवसरात्र करत होते काम मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच एपीएमसीमधील या कारखान्यावर छापा टाकला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे पाम तेलात रसायन मिसळून बनवलेले शेंगतेल गुजरात, सोना व सौराष्ट्र या नावाने, तर राईचे तेल केशव ब्रॅण्डच्या नावाने विकले जात होते. भेसळ करण्यासाठी मोठमोठ्या टाक्या बसवून कारखाना तयार केला होता. त्यामध्ये बाहेरून मागवलेले पामतेल ओतून त्यात वेगवेगळे रसायन मिश्रण करून ते डब्ब्यात भरले जात होते. यासाठी सुमारे २० कामगार दिवसरात्र त्याठिकाणी काम करत होते. 

नवी मुंबईतील मार्केटमध्ये चक्क रसायन मिसळून नामांकित ब्रँडचे शेंगतेल व राईचे तेल बनवले जात होते. या ठिकाणी छापा मारण्यात आला.

टॅग्स :foodअन्नNavi Mumbaiनवी मुंबई