शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

आज शहरात योगपर्व

By admin | Updated: June 21, 2016 01:42 IST

सिडको आणि आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : सिडको आणि आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सकाळी ७ ते १० या वेळात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दोन सत्रामध्ये होणार असून सकाळी ६.३० ते ७ वाजेपर्यंत पूर्वतयारी, सकाळी ७ ते ७.४५ योग अभ्यास हे पहिले सत्र होणार आहे. दुसऱ्या सत्रात सकाळी ७.४५ ते ८.१५ या वेळेत योगसंबंधित नृत्य, व्यायाम प्रकार घेतले जाणार आहे आणि सकाळी ८.१५ ते ९ वाजेपर्यंत योग अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये शहरातील विविध शाळाही सहभागी होणार आहेत. या ठिकाणी मोफत आरोग्य व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडीमधील भारती विद्यापीठ शाळा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, कोपरखैरणेतील ज्ञान विकास संस्था, खारघरमधील बालभारती पब्लिक स्कूल, नेरुळमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, वाशीतील सेंट लॉरेन्स आदी शाळांमध्ये योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे धडे देण्यात येणार आहे. खारघरमधील आयटीएम कॉलेजमध्ये पोलिसांकरिता विशेष योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८ ते ११ या वेळेत पोलिसांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नेरुळ येथे योग प्रशिक्षक साबीर शेख यांच्या वतीने सेक्टर २९ येथे योगाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. सीबीडी सेक्टर ९ परिसरातील अंबिका योग कुटीरच्या वतीनेही योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून योगासनांच्या माध्यमातून योग दिवस साजरा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)