शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक युगातील यशोदा

By admin | Updated: May 10, 2015 10:16 IST

भगवान श्रीकृष्णाला जन्म देवकीने दिला होता. पण लहानपणापासून त्याला घडवले ते यशोदाने. त्याची कथा आपण अनेकदा वाचली असेल.

भक्ती सोमण, मुंबईभगवान श्रीकृष्णाला जन्म देवकीने दिला होता. पण लहानपणापासून त्याला घडवले ते यशोदाने. त्याची कथा आपण अनेकदा वाचली असेल. किंबहुना यशोदाचा मुलगा म्हणूनच कृष्णाकडे पाहिले जाते. ही झाली पुराणकाळातील गोष्ट. आज २१ व्या शतकातही अशी एक आई आहे की जिने आपल्या मुलाच्या मित्राला गेली १८ वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले आहे. त्या आईचे नाव नीना म्हात्रे, तर तो मुलगा म्हणजे तुषार देशमुख. तुषारची आई प्रीती यांचे ९३ साली झालेल्या बॉंबस्फोटात निधन झाले. त्या वेळी तुषार ९ वीत होता. यामुळे साहजिकच संपूर्ण देशमुख कुटुंबाला धक्का बसला होता. तुषारही कोलमडला होता. आईला जाऊन वर्षही होत नाही तोवर त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र त्या नव्या आईला स्वीकारणे तुषारसाठी सोपी गोष्ट नव्हती. ती आई इतरांसाठी डबे करून विकायची. पण घरी तुषारला मात्र वडापाववर दिवस काढावे लागले. अशा अनेक गोष्टी घडत असताना हळूहळू वडिलांशीही संवाद तुटत गेला. पुढे १० नंतर कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी लागणारी फी त्याने घरोघरी लोणची, पापड-मसाले विकून जमा केली. कीर्ती कॉलेजमध्ये काही दिवसांतच प्राचार्यांनाही तुषारच्या एकंदर परिस्थितीची कल्पना आली. कारण घरी झोपण्यापेक्षा तुषार कॉलेजच्या कँटीनमध्ये झोपत असे. हे पाहून तुषारच्या परिस्थितीशी कल्पना आल्यावर त्यांनी त्याला हॉस्टेलमध्ये राहण्यास सांगितले. कॉलेजमध्ये ११ वीत त्याची भेट योगेश म्हात्रेशी झाली. मैत्री वाढत गेल्यावर साहजिकच तुषारचे योगेशच्या घरी येणेजाणे वाढले. योगेशच्या आई नीना आणि वडील दिलीप म्हात्रे यांच्याशीही खूप छान सूर जुळले. तुषारसाठी आवडीचे पदार्थ बनवण्याबरोबरच आजारपणातही त्याला आधार दिला. सलग ६ महिने हॉस्टेलवर राहत असताना तुषारच्या मेहनतीची, जगण्याच्या जिद्दीची कल्पना त्यांना आली. १२ वी झाल्यावर एक दिवस योगेशनचे आपण कायमच तुषारला आपल्याकडे आणायचे का, अशी विचारणा आई-बाबांकडे केली. नीना आणि दिलीप यांनी काही महिन्यांची ओळख असलेल्या तुषारला आपल्याकडे ठेवायचे हा निर्णय कुठलाही आढेवेढे न घेता पक्का केला. समाज, आपले इतर कुटुंब काय म्हणेल याचा कुठलाही विचार त्यांनी त्याक्षणी केला नाही. योगेश, कुंदन या आपल्या मुलांप्रमाणेच आता तुषार आपला तिसरा मुलगा असल्याचे त्यांनी ठरवून टाकले. कोणाचीही पर्वा त्यांनी केली नाही. तेव्हापासून आजवर म्हात्रे कुटुंबीयांच्या प्रत्येक निर्णयात कुटुंबाचा एक भाग म्हणून तुषारचा सहभाग असतो. अठरा वर्षांच्या काळात या विविध प्रसंगांत नीना आणि तुषारचे नाते आई-मुलगा म्हणून खूप बहरत गेले. तुषारला त्यांनी अगदी प्रत्येक गोष्टीत भरभक्कम साथ दिली. १३ वी नंतर टेन्शनमुळे तुषारला ब्लडप्रेशरचा खूप त्रास झाल्याने अ‍ॅडमिट करावे लागले होते. त्यावेळी ६ दिवस हॉस्पिटलमध्ये दिवसरात्र नीना-दिलीप आणि योगेश त्याच्या सोबत होते. नीना तर हॉस्पिटलमधून तुषारला घेऊनच घरी गेल्या. तर दोन वर्षांपूर्वी नीना यांना काही दिवस अस्वस्थ वाटत होते. ती चलबिचल तुषारच्या लक्षात आली होती. त्यांनी याची कल्पना योगेशलाही दिली. पण पाच दिवसांनी खूप अस्वस्थ वाटतंय म्हणून नीना यांनी पहिला फोन तुषारलाच केला. १३ वी नंतर योगेश आणि तुषार यांनी माया आॅटो रेन्टल हा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पैशांची अत्यंत आवश्यकता होती. त्या वेळी परिस्थिती कळल्यावर क्षणार्धात दागिन्यांचा डबा तुषारच्या हाती दिला. अशा कित्येक प्रसंगांत तुषार आणि नीना यांचे आई-मुलाचे नाते वृद्धिंगत होत गेले आहे.