शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधामुळे यादवनगरची कारवाई अखेर थांबली

By admin | Updated: February 14, 2017 04:33 IST

यादवनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना रहिवाशांनी तीव्र विरोध करत ठिय्या मांडला. अशातच कारवाईपूर्वीच

नवी मुंबई : यादवनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना रहिवाशांनी तीव्र विरोध करत ठिय्या मांडला. अशातच कारवाईपूर्वीच विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांची प्रकृती खालावल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, नागरे यांची प्रकृती ठीक असून त्यांना डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.एमआयडीसी व महापालिकेच्या वतीने संयुक्तरीत्या कारवाईची मोहीम शहरात सुरु आहे. यानुसार मागील काही दिवसात यादव नगर, चिंचपाडा व देवीधाम नगर परिसरातील एक हजाराहून अधिक अनधिकृत झोपड्या व गाळे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. एमआयडीसीचे भूखंड बळकावून भूमाफियांनी त्यावर झोपड्या उभारुन त्या विकलेल्या आहेत. यानुसार सोमवारी देखील त्याठिकाणी एमआयडीसी व पालिकेची संयुक्त कारवाई ठरलेली होती. कारवाईची संपूर्ण धुरा पालिकेकडे असल्यामुळे कारवाईपूर्वीच त्याठिकाणी पालिका अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून कारवाईची तयारी सुरु असतानाच घणसोलीचे विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे जमिनीवर कोसळले. हे पाहताच त्याठिकाणी उपस्थित इतर पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ लगतच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर काही वेळाने त्यांना नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नागरे यांच्याकडे घणसोलीचा पदभार असताना ऐरोली विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. सोमवारी देखील ते कारवाईच्या तयारीत असतानाच, रक्तदाब वाढल्याने चक्कर येवून जमिनीवर कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपस्थित इतर अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला सुरवात करण्यात आली. परंतु झोपडपट्टीधारकांनी मोठ्या संख्येने जमाव जमवून कारवाईला तीव्र विरोध केला. त्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या मार्गावर ठिय्या मांडून रोष व्यक्त केला. यावेळी घटनास्थळी अवघे १५ ते २० पोलीस उपस्थित होते. दिघा येथील अनधिकृत इमारतीवर जप्तीच्या कारवाईच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांचा त्याठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. यामुळे यादवनगरमधील कारवाईवेळी फक्त अतिक्रमण विरोधी पथकाचे पोलीस हजर होते. याचाच फायदा अनधिकृत झोपड्यांमधील रहिवाशांनी घेत कारवाईला विरोध केला. या प्रकारामुळे दुपारपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता कारवाईला स्थगिती देण्यात आली.