शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘बीपीसीएल’ कामगारांचे १२ तास कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 05:51 IST

कामावर असताना कामगाराचा मृत्यू : वारसाला नोकरी, भरपाईसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

उरण : भेंडखळ-बोकडवीरा हद्दीत बीपीसीएल कंपनीच्या गॅस भरण्याच्या प्रकल्पात मंगळवारी मध्यरात्री दयानंद ठाकूर (५५) या रात्रपाळीतील कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, पण मृत कामगाराच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी मध्यरात्रीपासूनच ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले होते. यामुळे मध्यरात्रीपासून बीपीसीएल प्रकल्पाचे कामकाज १२ तास बंद पडले होते.उरण येथे भेंडखळ-बोकडवीरा हद्दीत बीपीसीएल प्रकल्प आहे. दररोज सुमारे पाच हजार सिलिंडर आणि शेकडो गॅस टँकर भरून देशभरात वितरित केले जातात. या प्रकल्पात मंगळवारी मध्यरात्री दयानंद ठाकूर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनास शासकीय इंदिरा गांधीरुग्णालयात नेण्यात आला, पण मृत कामगाराच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी मध्यरात्रीपासूनच ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले होते, तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास कामगारांसह त्यांचे कुटुंबीयही राजी नव्हते. यामुळे १२ तास मृतदेह रुग्णालयातच पडून होता. वारसाच्या नोकरीचा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच्या भूमिकेवर कामगार अडून बसले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली होती. परिणामी, या प्रकल्पातील कामकाज तब्बल बारा तास बंद पडल्याचे सांण्यात आले.तब्बल सहा तास मॅरेथॉन चर्चाकामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यास बुधवारी सकाळपासूनच शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली, बीपीसीएल अधिकाºयांबरोबर तब्बल सहा तास मॅरेथॉन चर्चा सुरू होती. या चर्चेत मृत कामगाराच्या वारसाला नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस पत्र पाठविण्याचे, तसेच मरण पावलेल्या कामगाराला मिळणाºया ६० ते ६५ लाखांच्या लाभाव्यतिरिक्त आणखी अतिरिक्त सुमारे ४० लाख मिळून, एकूण एक कोटी पाच लाखांची रक्कम देण्याचे बीपीसीएलने मान्य केले आहे. बीपीसीएल अधिकाºयांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर, १२ तासांनंतरच बंद मागे आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आमदार मनोहर भोईर यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यू