शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानक रोडवरील दुभाजकाचे काम अखेर सुरू; रेल्वे स्थानक रस्ता झाला सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:03 IST

Panvel : पनवेल शहरातील महापालिकेकडून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे कामाला ब्रेक देण्यात आला होता.

कळंबोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रेल्वे स्थानक रोडचे नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्ता प्रकाशमय झाला आहे. वाहने या रस्त्यावरून सुसाट धावत आहेत. आता रस्त्यावरील दुभाजकाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरुवात झाली आहे. दरवर्षी खड्ड्यातून रस्ता काढावा लागणाऱ्या पनवेलकरांना आता दिलासा मिळाला आहे.पनवेल शहरातील महापालिकेकडून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे कामाला ब्रेक देण्यात आला होता. ती कामे जुलैपासून सुरू करण्यात आली आहेत. पनवेल शहरांतून जाणाऱ्या महामार्गावरील पुलाचे काम करत असताना, वाहने बसस्थानकाच्या पाठीमागील रस्त्यावरून वळविण्यात आली होती. त्याचबरोबर, पनवेल रेल्वे स्थानक गाठण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जात असल्याने, या ठिकाणी वाहनाची वर्दळ मोठी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आल्याने, महापालिकेने ठेकेदारामार्फत या रस्त्याचे काम सुरू केले आहे. ६०० मीटर लांब तर १८ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी साडेचार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. यात सांडपाणी वाहिन्या, भूमिगत गटारे, विद्युत जोडणी, दुतर्फा बंदिस्त गटारे, त्याचबरोबर २८ पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर आता दुभाजकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

झोपडपट्टीचा  त्रास कायमरस्त्यावरील होणारी पार्किंग आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या नवनाथनगर झोपडपट्टीचा त्रास वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यावर वाहने आडवी-तिडवी पार्क केली जात आहेत. त्यामुळे चारचाकी वाहने, एनएमएमटी बसेस चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झोपडपट्टीतील लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. त्यामुळेही लहान-मोठे अपघात होत असून, झोपडपट्टीधारक आणि वाहन चालकात नेहमी वाद होत आहेत.

टॅग्स :panvelपनवेल