नवी मुंबई : केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करता नागरिकांच्या प्रश्नांसाठी झोकून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या युवक मेळाव्यात केले.धर्म, जात, पंथ, प्रांत न पाहता माणुसकीच्या नात्याने लोकांची कामे करण्याचे आवाहन नाईक यांनी यावेळी उपस्थित युवक कार्यकर्त्यांना केले. तसेच त्यांनी यावेळी ‘वन बुथ,टेन युथ’ ही संकल्पना मांडून या माध्यमातून आपल्या बुथमधील नागरिकांच्या नियमित संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या.ढोल-ताशांच्या गजरात या मेळाव्याला सुरु वात झाली. गणेश नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर जयवंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सूरज पाटील यांनी, गणेश नाईक यांचा जनता दरबार पुन्हा भरावा यासाठी आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.>मी राष्ट्रवादीमध्येचपक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व अष्टपैलू व चतुरस्त्र आहे. त्यांच्या विचारांशी मी समरस झालो आहे. त्यामुळे अन्य पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी अखेरपर्यंत राष्ट्रवादी काँगे्रसमध्येच राहीन, असे गणेश नाईक यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
जनतेच्या प्रश्नांसाठी झोकून काम करा, गणेश नाईक यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:01 IST