शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

कुटुंब नियोजनात महिला सॉफ्ट टार्गेट

By admin | Updated: July 14, 2015 23:17 IST

पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आजही समाजात मोठ्या प्रमाणात जाणवतो. सरकार आणि प्रशासन एखादा उपक्रम राबवते तेव्हाही स्त्रियाच सॉफ्ट टार्गेट होताना दिसतात.

- आविष्कार देसाई,  अलिबागपुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आजही समाजात मोठ्या प्रमाणात जाणवतो. सरकार आणि प्रशासन एखादा उपक्रम राबवते तेव्हाही स्त्रियाच सॉफ्ट टार्गेट होताना दिसतात. रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या दहा वर्षांत राबविलेल्या कुटुंब कल्याण कार्यक्रमात स्त्रियांचाच टक्का अधिक असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. लोकसंख्या आटोक्यात राहावी यासाठी सरकार विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. ‘मंत्र सुखी संसाराचा, दोन मुलांमध्ये तीन वर्षे अंतराचा’ असे स्लोगन आरोग्य विभागाने तयार केले आहे. याच माध्यमातून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसबंदी शस्त्रक्रिया, गर्भनिरोधक गोळ््या, तांबी, निरोध यासारखे अन्य पर्याय नागरिकांपुढे आहेत.सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट ठरवून दिले जाते. त्यानुसार आरोग्य यंत्रणेमार्फत कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविला जातो. शहरात अथवा ग्रामीण भागात कुटुंब नियोजनासाठी नसबंदी शस्त्रक्रियेसाठी महिलाच पुढाकार घेताना दिसतात तर पुरुष अशी शस्त्रक्रिया करून घेण्यापासून दूर जातात.१९९९-२००० ते २०१४-२०१५ या कालावधीमध्ये एक लाख ९१ हजार ९७६ जणांची नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये महिलांचा आकडा तब्बल १ लाख ७२ हजार ८५७ असा आहे, तर केवळ २ हजार १५४ पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. २००४-०५ या कालावधीत सर्वाधिक १५ हजार ३२० नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये महिलांचे प्रमाणे हे १४ हजार २५८, तर पुरुषांचे प्रमाण हे फक्त १ हजार ६२ होते.सध्या पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येतात, मात्र कुटुंब नियोजनाची वेळ येते तेव्हा स्त्रियांनाच पुढे केले जाते.नसबंदी शस्त्रक्रियेबाबत बरेच गैरसमज आहेत. महिलांपेक्षा पुरुषांची शस्त्रक्रिया सोपी आणि कमी त्रासाची आहे. मात्र पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच या शस्त्रक्रियेसाठी सहज तयार होतात.- डॉ. बाळासाहेब जगदाळे, स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञत्याग करणे, कष्ट करणे हे महिलांचेच काम आहे. त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना सहज टार्गेट केले जाते.आदिवासी, कातकरी महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो.- वैशाली पाटील, कार्यकर्त्याशस्त्रक्रियेची आकडेवारीवर्षपुरुष स्त्री १९९९-२०००१४११,३२६ २०००-०१ १६११,९९८ २००१-०२ ४४ १३६६४ २००२-०३ ८८ ११,०८३ २००३-०४ १२९ १४०७३ २००४-०५ १०६२ १४,२५८ २००५-०६ ४३९ १३,५६५ २००६-०७ ५८ ११,८५२ २००७-०८ ९८ १०,८२३ २००८-०९ २९ ९७४८ २००९-१० ४८ ९४६३ २०१०-११ ५१ ८०८३ २०११-१२ ४३ ८०८१ २०१२-१३ २५ ८५५४ २०१३-१४ ३३ ८६३५ २०१४-१५ ०७ ७६५१ एकूण २१५४ १,७२,८५७