शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीतल्या महिला असुरक्षित?; अडीच वर्षांत ३७८ बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 00:16 IST

फूस लावून पळवल्या जात आहेत मुली

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू लागला आहे. मागील अडीच वर्षात नवी मुंबईसह पनवेल, उरणमध्ये बलात्काराच्या ३७८ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने चिंता व्यक्त होत आहे.उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा देशभरात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही बलात्कार करून हत्येच्या घटना देशात घडल्या आहेत. मात्र, सातत्याने घडणाºया अशा घटनांमुळे राज्यातीलही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. अशातच नवी मुंबईत समोर येऊ लागलेल्या बलात्काराच्या घटनांनी स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया शहराला गालबोट लागत चालले आहे. नुकतेच नेरुळ येथे १४ वर्षीय मुलीवर सातत्याने बलात्कार करून तिला गरोदर केल्याची घटना उघडकीस आली.दरम्यान, हे प्रकरण दडपण्यासाठी तिचा गर्भपात करण्याचाही प्रयत्न झाला, परंतु हाथरस येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर येताच शहरात खळबळ उडाली. त्यामुळे नवी मुंबईतही महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मागील अडीच वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बलात्काराच्या ३७८ घटना घडल्या आहेत. त्यापैकी २०१८ मध्ये १५५ व २०१९ मध्ये १५३ घटना घडल्या आहेत, तर चालू वर्षात आॅगस्ट अखेरपर्यंत बलात्काराच्या ७० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू असतानाही त्या कालावधीतही बलात्काराच्या घटना सुरूच होत्या. मागील दोन वर्षांत बलात्काराच्या घडलेल्या घटनांमध्ये जून, जुलै व आॅक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांत सर्वाधिक गुन्हे घडले आहेत.बलात्काराच्या घडलेल्या बहुतांश गुन्ह्यांची पोलिसांनी वेळोवेळील उकलही केलेली आहे. त्यात परिचित व अपरिचित व्यक्तींचा हात आढळून आलेला आहे, तर अडीच वर्षांत ५८० महिलांनी त्यांचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार, २०१८ मध्ये २२६, २०१९ मध्ये २५० तर चालू वर्षात आॅगस्टपर्यंत १०४ विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.अल्पवयीन मुली वासनेच्या बळी : राज्यभर खळबळ उडवणारा सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशी हाही मीरा रोड येथून येऊन नवी मुंबईतील अल्पवयीन मुलींना स्वत:च्या वासनेला बळी पाडत होता. प्रवासादरम्यान रस्ता चुकलेल्या महिलेला मदतीच्या एक तासात दोनदा गँगरेप झाल्याचीही घटना फेब्रुवारी महिन्यात रबाळे एमआयडीसी हद्दीत घडली होती. यावरून महिलांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवतील, असे गुन्हेगार शहरात मोकाट फिरत असल्याचे दिसत आहे. परिणामी, २१ व्या शतकातली स्मार्ट सिटी महिलांसाठी असुरक्षित ठरू लागल्याची भावना निर्माण होऊ लागली आहे.दाखल झालेले गुन्हेगुन्हा २०२० २०१९ २०१८बलात्कार ७० १५३ १५५विनयभंग १०४ २५० २२६अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.चालू वर्षात आॅगस्टपर्यंत १०४ विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचेही गांभीर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार