शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

नवी मुंबईत महिला राजकारण्यांचा दबदबा; पंचवीस वर्षांमध्ये ४ महिला महापौरपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 23:50 IST

दोन वेळा भूषविले स्थायी समितीचे सभापतीपद; १७३ महिलांना मिळाली संधी

नामदेव मोरे 

नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणामध्ये महिलांनीही त्यांचा ठसा उमटविला आहे. २५ वर्षांमध्ये तब्बल १७३ महिला नगरसेविका झाल्या आहेत. चार वेळा महापौर, तीन वेळा उपमहापौर व दोन वेळा तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे सभापतीपदही महिलांनी भूषविले आहे. तब्बल १० महिलांनी तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासूनच महिला नगरसेविकांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे. २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये तब्बल १७३ महिला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या आहेत. पालिकेमधील सर्व महत्त्वाची पदे महिलांनी भूषविली असून शहरहितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सुषमा दंडे, विजया म्हात्रे यांनी महिलाही महापौरपद प्रभावीपणे सांभाळू शकतात हे दाखवून दिले. त्यांच्यानंतर महापौर झालेल्या मनीषा भोईर व अंजली भोईर यांच्या कार्यकाळात शहरात विकासाचे व्हिजन राबविण्यात आले. स्कूल, व्हिजन, उद्यान व्हिजन, तलाव व्हिजन, रोड व्हिजन अंतर्गत कामे याच काळात सुरू झाली. मोरबे ते दिघा जलवाहिनी, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, शहरात मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे, ठाणे-बेलापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे धोरण व देशातील पहिले दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्रही याच पाच वर्षांच्या कालावधीमध्ये उभारण्यात आले आहे.

राज्यातील व देशातील बहुतांश महानगरपालिकांमध्येही महापौर, उपमहापौर पदावर महिलांची वर्णी लावली जाते. परंतु महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाºया स्थायी समितीच्या सभापतीपदावर महिलांची वर्णी लावली जात नाही. नवी मुंबईमध्ये मागील पाच वर्षांमध्ये नेत्रा शिर्के व शुभांगी पाटील यांनी यशस्वीपणे स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. आतापर्यंत तीन वेळा उपमहापौरपद महिलांनी भूषविले आहे. विद्यमान उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांचे कामही प्रभावी आहे. येणाºया निवडणुकीमध्येही १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. यामुळे सभागृहात महिला जास्त असणार आहे.मंदा म्हात्रे सर्वात यशस्वी राजकारणीनवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत १७३ नगरसेविका निवडून आल्या आहेत. या सर्वांमध्ये मंदा म्हात्रे या सर्वात यशस्वी लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. १९९५ च्या पहिल्या निवडणुकीमध्ये नगरसेविका झालेल्या मंदा म्हात्रे यांनी पालिकेत सभापतीपदही भूषविले आहे. एकदा विधान परिषद सदस्या व विधानसभा निवडणुकीमध्ये दोन वेळा बेलापूर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये स्वत:चा ठसा उमटविला आहे.१५ महिलांना दोन वेळा संधीमहापालिकेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत उषा भोईर, कमलताई पाटील, मनीषा भोईर, राधा कुलकर्णी, वंदना सोनावणे, भारती कोळी, विजया ठाकूर, नीलम जगताप, वर्षा नाईक, बेबीताई पाटील, रोहिणी शिंदे, मोनिका पाटील, शुभांगी पाटील, कोमल वास्कर, सरोज पाटील या दोन वेळा निवडून आल्या आहेत.