शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: September 17, 2016 02:28 IST

देवदर्शनासाठी जाणाऱ्या दांपत्याच्या मोटारसायकलचा अपघात होवून महिलेच्या मृत्यूची घटना शुक्रवारी वाशी खाडीपुलावर घडली

नवी मुंबई : देवदर्शनासाठी जाणाऱ्या दांपत्याच्या मोटारसायकलचा अपघात होवून महिलेच्या मृत्यूची घटना शुक्रवारी वाशी खाडीपुलावर घडली. डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी डंपर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.भागवंती जैन (४३) असे अपघातामध्ये मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या सानपाडा येथील राहणाऱ्या आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पती दिनेशकुमार यांच्यासोबत त्या मोटारसायकलवरून (एमएच ४३ ए.एस.५२०९) गोवंडी येथील जैन मंदिरात चालल्या होत्या. दरम्यान, वाशी खाडीपुलावर त्यांचा अपघात झाला. समोर चाललेल्या डंपर व पुलाचा सुरक्षा कठडा यामधून मोटारसायकल पुढे नेण्याचा प्रयत्न दिनेशकुमार करत होते. यादरम्यान डंपरच्या पाठच्या भागाचा धक्का लागून त्यांची मोटारसायकल पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या भागवंती ह्या खाली कोसळल्या असता डंपरचे पाठचे चाक त्यांच्या अर्ध्या अंगावरून गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या दिनेशकुमार यांनी दगडाने डंपरची काच फोडून रोष व्यक्त केला. त्यामुळे डंपर चालकाने डंपर रस्त्यावरच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे वाशी खाडीपुलावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लागलेल्या रांगा व अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने मार्गावरून हटवल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने पुलावरील वाहतुक सुरळीत झाली. सदर अपघाताची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच पळालेल्या डंपर चालकाला देखील ताब्यात घेतले असून पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)