शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करून केली महिलेची हत्या; रिक्षाचालकाला अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 5, 2023 15:33 IST

तुर्भे एमआयडीसीतली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अत्याचार करून महिलेची हत्या केल्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. २२ मार्चला या महिलेचा मृतदेह अडवली भुतवली परिसरात आढळून आला होता. सदर महिलेची अद्याप ओळख पटली नसून ती बेघर असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

अडवली भुतवली येथील डोंगर भागात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून तिची हत्या करण्यात आली होती. घटनास्थळी तिची पिशवी आढळली असता त्यात तिचे दोन जोडी कपडे आढळून आले होते. हत्येचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, पवन नांद्रे, अशोक डमाळे, राजेंद्र घेवडेकर, महेंद्र डोके आदींचे पथक केले होते. त्यांनी सदर मार्गावरून गेलेल्या वाहनांची माहिती मिळवली असता एका संशयित रिक्षाची माहिती मिळाली होती. त्याद्वारे सीसीटीव्ही तपासले असता सदर रिक्षातून या महिलेने प्रवास केल्याचे दिसून आले. त्याद्वारे पोलिसांनी रिक्षाचा शोध घेऊन मोहम्मद अहमद मोहम्मद अली साईन (३६) याला अटक केली आहे. तो दहिसर मोरी गावचा राहणारा असून रिक्षाचालक आहे. 

२२ मार्चला तुर्भे स्टोअर येथून हि महिला त्याच्या रिक्षात बसली होती. त्यानंतर काही अंतरावरील एका देशी दारूच्या दुकानाबाहेरून मोहम्मद याने दारूची बाटली, पाण्याची बाटली व खाण्याचे साहित्य खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. अडवली भुतवली येथील निर्मनुष्य ठिकाणी मोहम्मद याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घटनास्थळीच पडलेला सिमेंटचा ब्लॉक तिच्या डोक्यावर मारून तिची हत्या करून पळ काढला होता. सदर महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून शरीरसंबंध करण्यासाठीच ती आपल्यासोबत रिक्षात आल्याचे मोहम्मद याने पोलिसांना सांगितले आहे. मात्र शरीरसंबंध केल्यानंतर तिने १ हजार रुपयांची मागणी केल्याने व पैसे न दिल्यास रस्त्यावर जाऊन आरडा ओरडा करण्याची धमकी दिल्याने हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी