शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात गळफास घेऊन महिलेची आत्महत्या; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 13, 2023 16:53 IST

मृतदेहावर अंत्यविधीला केला नकार, जरीना यांनी शुक्रवारी दवाखान्यातून काही रक्कम चोरली होती असे डॉ. थदाणी यांनी पोलिसांना सांगितले आहे. 

नवी मुंबई : नेरुळ येथील महिला डॉक्टरकडे काम करणाऱ्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्वचा स्पेशलीस स्नेहा थदाणी यांच्या दवाखान्यात शनिवारी सकाळी हि घटना घडली आहे. दरम्यान तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावरून त्यांनी रविवारी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 

जरीना शाह असे मृत महिलेचे नाव असून त्या नेरुळ सेक्टर ४ येथील डॉ. स्नेहा थदाणी यांच्याकडे कामाला होत्या. शनिवारी सकाळी रुग्णालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यामुळे त्यांना कोपर खैरणेतील डॉ. थदाणी यांच्याच वडिलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना कळवण्यात आले. हा प्रकार समजल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास व अंत्यविधी करण्यास नकार दिला आहे. त्यावरून रविवारी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी करून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. जरीना यांची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. तर नेरूळमध्ये घटना घडली असताना त्यांना तातडीने जवळपास अनेक रुग्णालये असतानाही त्याठिकाणी न नेता कोपर खैरणेला का नेले ? याबाबत देखील संशय व्यक्त केला आहे. 

दरम्यान जरीना यांनी शुक्रवारी दवाखान्यातून काही रक्कम चोरली होती असे डॉ. थदाणी यांनी पोलिसांना सांगितले आहे. शनिवारी सीसीटीव्ही मधून हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना एका खोलीत बसवून ठेवून चोरलेली रक्कम घरून मागवून घेण्यास सांगण्यात आले होते. यामुळे त्याच खोलीत त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले आहे. त्यानुसार रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासण्यासाठी ताब्यात घेतले असल्याचे नेरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. तसेच जरीना यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. स्नेहा थदाणी विरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही भगत यांनी सांगितले. पोलिसांच्या या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यविधीची तयारी दाखवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी